Vaishnavi Hagawane प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण अखेर अटकेत, कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?
Nilesh Chavan Arrested : पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेले वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीवर बावधन पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. हगवणे कुटुंबातील सर्व लोक सद्या पोलिस कोठडीत आहेत, परंतु, गेल्या दहा दिवसांपासून फरार असलेला बंदूकधारी निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

७ पथके घेत होते निलेश चव्हाणचा शोध
पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी निलेश चव्हाणला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणेचा मित्र आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण हा गेल्या 10 दिवसांपासून फरार होता. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची 4 पथकं तर पुणे पोलिसांची 3 पथकं राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होते. अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात यश आले आहे.
हे ही वाचा : Vaishnavi Hagawaneकेसमधील निलेश चव्हाण कोण, पत्नीसोबतच्या संबंधाचे Video बनवले, करिश्माशी नातं काय?
नेपाळ बॉर्डरवरुन उचलले निलेश चव्हाणला
अखेर बंदूकधारी निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा आहे. तो 21 मे पासून फरार होता. अखेर 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा : वैष्णवीच्या तोंडावर थुंकली, मारहाण केली; कोण आहे वैष्णवी हगवणेची नणंद करिश्मा हगवणे उर्फ 'पिंकी ताई'
कोण आहे निलेश चव्हाण?, हगवणे कुटुंबाशी संबंध काय?
निलेश चव्हाण याचा बांधकाम व्यवसाय असून, तो पोकलेन मशीनच्या व्यवसायातही सक्रिय आहे. तो शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा.
निलेश चव्हाण याच्याविरुद्ध 14 जून 2022 रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात निलेश आणि त्याचे काही नातेवाईक आरोपी होते. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळूनही, वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामिन मंजूर केला होता. पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीमध्ये निलेश चव्हाणच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट असल्याचे देखील समोर आले. पत्नीसोबतचे शारिरीक संबंधांचे त्याने व्हिडिओ बनवल्याचा आरोप देखील त्याच्या पत्नीने केलेले आहेत.
दुसरी म्हणजे, वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात देखील त्याला सहआरोपी करण्यात आलेले आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा एका वर्षाचा मुलगा हा निलेश चव्हाणच्या प्लॅटमध्ये होता, त्यावेळी वैष्णवीचे आई वडील तिच्या मुलाला घ्यायला गेले होते, परंतु, त्यावेळी निलेशने बंदूकीचा धाक दाखवून त्यांना हाकलून लावले होते. त्यानंतर निलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला.












Click it and Unblock the Notifications