Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'देवाभाऊ' अन् जिकडे जाऊ तिकडे खाऊ; उद्धव ठाकरेंनी घेतला फडणवीसांचा खरपूस समाचार

Uddhav Thackeray Attack on Mahayuti : ⁠देवा भाऊ आणि जाऊ तिकडे खावू, अशी त्यांची प्रवृत्ती आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते.

पुढे बोलताना ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात काय दिले जाणार यावर भाष्य केले. ठाकरे म्हणाले की, मुलींबरोबर राज्यातील मुलांनाही आम्ही मोफत शिक्षण देणार आहोत. पाच जीवनावश्यक वस्तू आहेत त्यात शेतकऱ्यांचं नुकसान न करता स्थिर ठेवणार आहे. आम्ही शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांचं कर्ज माफ करुन दाखवणार आहे, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

Uddhav Thackeray

शिवरायांचे नावं घेतली की यांची लाहीलाही होते

उद्धव ठाकरे म्हणाले, मी प्रत्येक जिल्हात शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधणार आणि सुरतेलाही बांधणार आहे. शिवाजी महाराज म्हटलं की यांच्या अंगाची लाही लाही होते. ⁠देवा भाऊ आणि जाऊ तिकडे खावू. मुंब्र्यात त्यांनी मंदीर बांधायला चॅलेंज केलं. मात्र ते विसरले की मुंब्र्याच्या वेशीवर शिवाजी महाराज, तुकाराम यांची वेस आहे. ज्या गद्दाराला तुम्ही फोडला आणि मुख्यमंत्री म्हणून डोक्यावर बसवला. त्याच्या ठाण्यात तुम्हाला मंदिर बांधता येत नाही, असं वाटत असेल तर कशाला डोक्यावर बसवला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केला.

मग काय गच्चीत मासे सुकवणार आहेत का?

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कोळीवाडयाचा विकास आम्ही करणार आहोत. हे इमारत बांधून देतील मग त्यांच्या होड्या काय पार्किंगमध्ये लावणार का आणि गच्चीत मासे सुकवणार का? आता निवडकांचे फटाके वाजायला लागले आहेत. आपल्याकडे आयटम बॉम्ब आणि पलिकडे फुसके आणि लवंगी आहेत. 23 तारखेला फटाके वाजवण्याचा निश्चय करायला आज आपण आलो आहोत. फराळ करायला जमत नाही असं काही जण म्हटले कारण महागाई वाढली आहे.

उद्योगधार्जिण्या निर्णयाची पहिले होळी करु

संविधान बचाव हा जर भाजपला फेक नॅरेटीव्ह वाटत असेल तर ⁠मग धारावीची जागा देण्याच्या संदर्भात काढलेले निर्णयाच काय? आमचं सरकार आल्यानंतर आम्ही उद्योगपतींसंदर्भात घेतलेले रद्द करणार आहोत. ⁠सर्व त्यांना टीडीआर द्यायचा आणि जागा ही द्यायची. कोरोना काळात आम्ही धारावी वाचवली होती आता पुन्हा एकदा धारावी आम्ही वाचवणार आहोत. कोळीवाडेही आम्ही वाचवणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+