Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे जमीन घोटाळ्याचे बादशहा!"- आशिष शेलारांचा गंभीर आरोप

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर भाजपचे नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी जहाल टीका केली आहे, यासह आरोप लावला की, ते लँडस्कॅमचे बादशहा अर्थात जमीन घोटाळ्यांचे राजा आहेत, ठाकरेंनी नवीन बोलणे सोडून दिले आहेत, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार आरोप करताना म्हणाले, उद्धव ठाकरेंनी जमीनीशिवाय काही नवीन बोलणे सोडून दिले आहे. ही जमीन अदानीला आणि ती जमीन अंबानींना दिली हेच ते बोलत असतात, असेही ते म्हणाले.

Uddhav Thackeray

एक कोटी चौरस फूट जमीन बिल्डरांना फुकटात दिली - शेलार

आशिष शेलार म्हणाले, मुंबई महानगर पालिका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात होती. मुंबईत आज जागा खरेदी करायची झाली तर एक चौरस फूट जमीन लाखोंच्या घरात आहे. ठाकरेंची सत्ता जेव्हा महानगर पालिकेत होती त्यावेळी त्यांनी विकासकांना एक कोटी चौरस फूट जमीन मोफत दिली होती असा आरोप त्यांनी केला आणि ते आम्हाला आता काय जाब विचारता असा सवालही त्यांनी केली आहे.

Take a Poll

ठाकरे खोटी माहिती पसरवत आहेत - शेलार

आशिष शेलार म्हणाले की, वक्फ कायद्यात सुधारणा झाल्यानंतर आता मशीद, स्मशानभूमी आणि संपत्ती घेणार अशी खोटी माहिती उद्धव ठाकरे हे पसरवत आहेत, मुळातः वक्फ कायदा हा गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे. नरेंद्र मोदी सरकार वक्फने ताब्यात घेतलेल्या जमीनी ज्याच्या त्याला परत देण्याचे काम करत आहे.

दोन्ही ठाकरेंच्या विरोधात शेलारांची वक्तव्यं

भाजप आणि शिवसेना (युबीटी)चे सख्य सर्वश्रुत आहे. आता त्यांचे नेतेही उद्धव ठाकरेंना पाण्यात पाहायला कचरत नाही. ते थेट कडाडून हल्ला चढवतात. आशिष शेलार यांनीही आता उद्धव ठाकरेंवर आरोप करत टोलेबाजी केली आहे. आशिष शेलार यांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध होते पण उद्धव ठाकरेंशी युती करण्यासंदर्भात ज्या हालचाली राज ठाकरेंच्या मनसेकडून सुरु आहेत त्याधर्तीवर राज ठाकरेंशी असलेल्या वैयक्तिक मैत्रीवर भाष्य केले. जर मैत्रीचे संबंध पक्षीय राजकारणाच्या आड येत असतील तर वैयक्तिक मैत्री वगैरे विषय संपला असे म्हटले, त्यानंतर आता उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे.

हेही वाचा : अटी-शर्ती नाहीत... संजय राऊतांनी सांगितला राज-उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याचा 'हा' प्लॅन, म्हणाले..

हेही वाचा : आता एकत्र येणार हे नक्की... पण राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातला वाद नेमका काय होता? वाचा इतिहास

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+