अटी-शर्ती नाहीत... संजय राऊतांनी सांगितला राज-उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याचा 'हा' प्लॅन, म्हणाले..

दिग्दर्शक संजय मांजरेकर यांच्या एका पाॅडकास्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली. त्यानंतर लगेचच शिवेसना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या सादेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्र हितासाठी आम्ही 'जी जानसे' काम करण्यास तयार आहोत, असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

Raj Thackeray-Uddhav Thackeray alliance

काय म्हणाले संजय राऊत?

राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आज खा. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्टपणे त्यांचे मत मांडले. ते म्हणाले, "हे दोन्ही नेते ठाकरे घराण्यातले आहेत. ते भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या विषयावर त्यांची सहमती होते, तर त्यात फार वादविवाद करणं योग्य नाही. काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हिताचा विषय मांडला. त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसादही महाराष्ट्राच्या हितासाठी होता. यामध्ये अटी-शर्ती कुठे आल्या? असा सवालही त्यांनी केला.

अटी-शर्ती कोणत्याही नाहीत

संजय राऊत पुढे म्हणाले की, यो दोन्ही नेत्यांनी फक्त महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं आहे. त्यामुळे त्यात कोणतीही अट किंवा कोणतीही शर्त नाही. प्रश्न इतकाच आहे की या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही. भाजप महाराष्ट्रहितात येत नाही, ही अट नाही तर ती लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल, तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचे आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे.

काहींना आवडत नाही

राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले काहीना आवडत नाही. काहींना आवडणारही नाही. त्यामुळे अटी व शर्तीच्या अफवा पसरविल्या जात आहेत. शिवसेना स्थापन झाली तेव्हा एकच ध्येय होते, ते म्हणजे महाराष्ट्र हिताचं, मराठी माणसाचं. आता महाराष्ट्र हितासाठी मतभेदाचे जोडे बाजूला ठेऊन महाराष्ट्र हितासाठी काही जण एकत्र येत असतील तर आपण त्यांचे स्वागत करायला हवे. उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट व शर्त टाकलेली नाही, याचा पुनरुच्चार खा. संजय राऊत यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+