शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजी..? अजित पवारांनी दूर केला दुरावा; वाचा राजभवनात नेमकं काय घडलं..
मुंख्यमंत्रीपदावरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वाधिक जागा जिंकत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच नवे मुख्यमंत्री होईल, असे सांगितले जात आहेत. त्यांचं नावही फायनल झाल्याचं बोललं जात आहे. मात्र या बातम्यांनंतर एकनाथ शिंदे व फडणवीसांमध्ये दुरावा आल्याच्याही चर्चा होत आहेत. याच बातम्यांनंतर शिंदे-फडणवीस यांच्यातील दुरावा, एका कार्यक्रमात स्पष्ट दिसला. त्यानंतर मात्र राजभवनात अजित पवारांनी परफेक्ट टायमिंग साधत या दोघांत समेटही घडला. नेमका काय होता किस्सा, तेच पाहू...

शिंदे-फडणवीस यांच्यात दुरावा?
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी शिवसेना नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र आता दिल्लीतून सूत्रे हलून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. याच घडामोडीनंतर शिंदे व फडणवीस यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या. त्यात आज मुंबईत शहीद दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला शिंदे व फडणवीस हे दोन्ही नेते एकत्र दिसले. मात्र या दोघांच्याही देहबोलीवरून सगळंच अलबेल नसल्याचं स्पष्ट दिसलं. या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकमेकांना टाळत असल्याचं दिसलं. तशा चर्चाही रंगल्या.
अजित पवारांचा चर्चांना पूर्णविराम
या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे हे राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी गेले. तेथे अजित पवार व फडणवीस हेही उपस्थित होते. तत्पूर्वी फडणवीस-शिंदे यांच्यातील दुराव्याच्या बातम्या, राज्यभर पोहोचल्या होत्या. पत्रकारांनी या दोघांतील दुराव्याचे दृश्य टिपण्यासाठी कॅमेरे या दोघांकडे घेतले. मात्र चाणाक्ष अजित पवारांनी हे हेरले आणि राज्यपालांसमोर बसताना एकनाथ शिंदे यांच्या जवळ देवेंद्र फडणवीसांना बसायला जागा दिली. ते स्वतः एकनाथ शिंदे यांच्या शेजारी होते मात्र ते तेथून लांब गेले व फडणवीसांना जागा करुन दिली. अजित पवारांचा हा चाणाक्षपणा चांगलाच चर्चेत आला. अजितदादांमुळेच मीडियाला जे दृष्य टिपायचे होते, ते टिपता आले नाही.
वीस मंत्र्यांचा होणार शपथविधी
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. आता या मंत्रीमंडळाचा शपथविधी कधी होईल, एवढीच उत्सुकता आहे. या मंत्रीमंडळात महायुतीतीत तिन्ही पक्षांच्या तब्बल २० मंत्र्यांचा शपथविधी होईल, असेही बोलले जात आहे. त्यात भाजपचे १०, शिवसेना शिंदे गटाचे चार व अजित पवार गटाच्या चार मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याच्या चर्चा आहेत. आता हे मंत्री कोण व त्यांचा शपथविधी कधी होणार, या चर्चा रंगल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications