Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुन्हा देवेंद्रच..! शपथविधीची तारीख ठरली, ठिकाणही ठरलं; वाचा आत्ताची अपडेट

मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचं उत्तर आता जवळपास मिळालं आहे. महायुतीचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव फायनल झाल्याची बातमी आता महायुतीच्या गोटातून समोर आली आहे. विशेष म्हणजे शपथविधी कधी होणार आणि तो कोठे होणार, या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे.

Devendra Fadnavis

कधी होणार महायुतीचा शपथविधी?

येत्या पाच डिसेंबरला नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती काही मिडिया हाऊसने दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असून, राज्यात पुन्हा देवेंद्र सरकार येणार आहे. आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता नवे मंत्रीमंडळ शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहे. महायुतीच्या सर्व आमदारांसोबतच काही व्हिआयपी पाहुणेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यक्रमासाठी सर्व आमदारांनी उपस्थित रहावे, अशा सूचना दिल्याचेही समजते. तसेच मुंबईबाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा, असे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

दोन डिसेंबरला आमदारांची बैठक

येत्या २ किंवा ३ डिसेंबरला भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला होईल. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी भाजप आमदारांची बैठकही पार पडेल. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत ही माहिती दिली आहे. त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पास देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल. महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष पासेसची सुविधा असणार आहे. यासाठी तब्बल 15 ते 16 हजार पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+