Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे शिंदेंच्या चिंतेत वाढ; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा?

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीने राज्यातील राजकारणात खळबळ माजवली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतात, यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

amit shah eknath shinde meeting


भाजपकडून काही खासगी संस्थांकडून संबंधित युतीबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याचे निष्कर्ष अमित शाह यांनी शिंदे यांच्याशी शेअर केल्याची माहिती मिळते. या चर्चेत मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याच्या शक्यतेपासून, विविध राजकीय समीकरणांपर्यंत अनेक पर्यायांवर विचारमंथन झाले.

भाजपमध्ये वाढती चिंता

राज ठाकरे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका जाहीर मंचावर हजेरी लावली होती. मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोघांमध्ये झालेल्या संवादामुळे राजकीय वर्तुळात संभाव्य युतीची शक्यता चर्चेत आली. तथापि, राज यांनी स्पष्टपणे युतीची घोषणा केलेली नसली, तरीही भाजप व शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.

भाजपचे काही नेते, विशेषतः खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, अशा भूमिकांमुळे हिंदी भाषिक मतदार महायुतीच्या पाठीशी राहतील का, यावरही चर्चेत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेची तपासणी

शिक्षण विभागाच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज यांचं मन वळवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यात यश मिळालं नाही. यावरून अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून राज यांची भूमिका, तसेच त्रिभाषा सूत्रावरील विरोधाचे नेमके कारण समजून घेतल्याची माहिती आहे.

वाद टाळण्याचे निर्देश

महापालिका निवडणुका होईपर्यंत शिंदे गटातील काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे निर्माण होणारे वाद टाळावेत, अशा स्पष्ट सूचना अमित शाह यांनी शिंदे यांना दिल्या आहेत. भाजपच्या काही मंत्र्यांनी अशा कृतींबाबत दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या असल्याचे समजते. यामुळे महायुतीमध्ये एकसंघपणा असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सल्ला शाह यांनी दिला.

शिंदे यांच्या दिल्ली दौर्यावर विरोधकांची टीका

एकनाथ शिंदे यांची दिल्ली भेट ही केवळ "गुरुवंदनासाठी" होती, अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी गुरुवारी केली. "आमचे गुरू मातोश्रीवर बसले आहेत, शिंदे साहेबांचे गुरू मात्र आता दिल्लीला गेले आहेत," असे ते म्हणाले. गुरुपौर्णिमेनिमित्त राजन विचारे यांनी ठाण्यातील शक्तिस्थळावर जाऊन दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांना अभिवादन केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+