कार शौकीन असणाऱ्या पुणेकरांसाठी दुःखाची बातमी; खिशाला झळ तर बसेलच पण...
राज्यातील सर्वाधिक कार खरेदी ही पुण्यात होते. गेल्यावर्षी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ६९ हजार कार खरेदी करण्यात आल्या. मात्र आता पुणेकरांच्या खिशाला झळ बसेल, अशी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये चारचाकी खरेदीवर एक टक्के जादा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वाधिक वाहन खरेदी करणाऱ्या पुण्यातील नागरिकांच्या खिशाला जास्त आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

राज्यात पुणेकरांना सर्वाधिक फटका
गेल्या चार-पाच वर्षांतील महाराष्ट्रातील आकडेवारी पाहिली तर, चारचाकी घेण्याकडे सर्वाधिक कल राहिला आहे. २०२४-२५ या एका वर्षांत एकट्या पुण्यात ६९ हजार चारचाकी खरेदी करण्यात आल्या. या मधून 'आरटीओ'ला कोट्यवधीचा महसूल मिळाला. मात्र आता राज्य सरकारने वाहनखरेदीवर एक टक्का जादा कर आकारण्याचा निर्णय घेतल्याने कार खरेदी करणाऱ्या पुणेकरांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. पुण्यात सर्वाधिक कार खरेदी होत असल्यामुळे पुणे आरटीओला मात्र त्यातून जास्त महसूल मिळणार आहे.
कर एक टक्क्यांनी वाढला
यापूर्वी १० लाखांपर्यंत किंमत असलेल्या चारचाकी वाहनांवर १९ टक्के खरेदी कर लावत होता. तोच आता १२ टक्के झाला आहे. तसेच यापूर्वी १० ते २० लाखापर्यंत १२ टक्के, २० लाखांच्या पुढे १३ टक्के खरेदी कर होता. तोच आात अनुक्रमे १३ आणि १४ टक्के होणार आहे. त्यामुळे कार खरेदी करणाऱ्या पुणेकरांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
पुणेकरांना सर्वाधिक फटका
पुण्यात 'इम्पोटेंड' गाडयांचे शौकीन जास्त आहेत. पुणेकरांनी गेल्या वर्षी तीनशे पेक्षा जास्त इम्पोर्टेड गाड्या खरेदी करण्यात आल्या. चारचाकीमध्ये बीएमडब्ल्यू, ऑडी, रेंज रोव्हर यासह इतर महागड्या गाड्याही पुण्यात आल्या. यापूर्वी इम्पोटेंड गाड्यांसाठी २० लाख रुपये सर्व्हीस चार्ज लावला जात होता. आता तोच ३० लाख होणार आहे. त्यामुळे हौशींना एका गाडीसाठी दहा लाख रुपये जादा द्यावे लागणार आहेत.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications