"अजित पवारांवर आरोप केले त्यांनाच फाईल दाखवली, फसवणाऱ्या फडणवीसांवर खटला भरा" - सुप्रिया सुळे
Supriya Sule's Serious Allegation Against Devendra Fadnavis : अदृष्य शक्तींनी आर. आर. पाटील यांच्यावर ज्या फाईलवर सही केली असा आरोप केला आहे. त्या फाईलवरची फायनल चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली. देवेंद्र फडणवीसांचीच मुख्यमंत्री म्हणून सही आहे त्याच केसवर आणि त्याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यावर ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले त्या अजित पवारांना त्यांनी ती फाईल दाखवली हा गुन्हा असून देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला फसवले आहे असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांवर खटला भरायला हवा अशी मागणीही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली. सुळे या आज माध्यमांशी बोलत होत्या. इडी, सीबीआयचा कसा वापर केला. त्यातून अदृष्य शक्तींनी विरोधकांना कसे अडचणीत आणायला सुरूवात केली होती अशासंदर्भातील एका पुस्तकाचा त्यांनी आज दाखलाही दिला.

माझ्या तीन बहिणींवर रेड
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पुस्तकात अनेक गोष्टी आहेत, दुखः एकाच गोष्टींचं झालं की, सिंचन घोटाळ्यात सर्व पुरुषांचा उल्लेख झाले पण वाईट वाटतं की, त्यात महिलांचाही उल्लेख झाला आहे. अदृष्य शक्ती महिलांच्या मागे कशी लागते याचे दुःख आहे. अदृष्य शक्ती माझ्या तीन बहिणींवर आयटीची रेड केली एक नाही तर पुर्ण पाच दिवस केली. रजनी इंदुलकर, मिता पाटील आणि विजया पाटील यांच्यावर त्या रेड होत्या."
देवेंद्र फडणवीसांवर खटला भरावा - सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "भुजबळ, नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत यांची कुटुंब कोणत्या परिस्थितीतून गेली हे मला माहीतेय. मला देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायचा आहे की, अदृष्य शक्तींनी आर. आर. पाटील यांच्यावर ज्या फाईलवर सही केली असा आरोप केला आहे. त्या फाईलवरची फायनल चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली. देवेंद्र फडणवीसांचीच मुख्यमंत्री म्हणून सही आहे त्याच केसवर आणि त्याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यावर ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले त्या अजित पवारांना त्यांनी ती फाईल दाखवली हा गुन्हा असून देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला फसवले आहे. देवेंद्र फडणवीसांवर खटला भरायला हवा. "
"फडणवीसांनी फाईल घरी का नेली"?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीसांनी राज्याला फसवले आहे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांना घरी बोलवून घेतले एकतर फाईल घरी आणलीच कशी, आणली तर ज्यांच्यावर आरोप केले त्यांना दाखवली कशी याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. सुनेत्रा पवार यांचेही नाव गोवले गेले त्यांचे नाव आणायची काय गरज होती माझा या सरकारवर आरोप आहे की, ते महिलांनाही यात अडकवत आहेत."
आघाडी म्हणून एकत्र प्रचार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाहीत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून पारदर्शकपणे निवडणूक व्हावी हा आम्हा सर्वांचा प्रयत्न असतो. एका सशक्त लोकशाहीत प्रचाराची प्रक्रीया त्याच्या नियम कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही करत असतो. महाविकास आघाडी आणि यातील मित्रपक्षांचा एकत्रित आम्ही प्रचार करत आहोत."
राजदिप सरदेसाईंच्या पुस्तकाचा उल्लेख
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आजच्या निवडणुकीचे चित्र मी सांगते आज वर्तमानपत्रात बातमी आली आहे तुम्ही ती पाहिली का नाही, हे मला माहीत नाही पण राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहिले आहे आणि त्यात एक मोठा दावा आला आहे. हा खूप गंभीर विषय आहे, याच विषयावर मी अनेकवेळा संसदेत आवाज उठवलेला आहे. माझ्या अनेक भाष्यात आणि माध्यमांसमोर मी बोलले आहे की, एजन्सीजचा गैरवापर केला जात आहे. विरोधी पक्ष फोडणे, त्यांची घरं फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी केल्या जात आहेत."
भाजपवर आरोप
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सातत्याने मी सांगत आले आहे की, एजन्सीजचा वापर एक अदृष्य शक्ती करते आहे. हे महाराष्ट्रापूरते सीमित नाही, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असा डेटा सांगतो की, सीबीआय, इडीच्या केसेस विरोधी पक्षांवर आहे आणि विरोधी पक्षांसंदर्भात मी उल्लेखही केलेला आहे आणि या पुस्तकातही आहे की, ज्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्याच लोकांना वाॅशिंग मशीनमध्ये टाकून भाजप सत्ता प्रस्तापित करते हे मी म्हणत आले आहे. हे मीच फक्त म्हणत नाही तर चॅनलवरही आलेले आहे. "
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी संसदेत आईसचा उल्लेख केला आहे, आईस म्हणजे बर्फ नाही तर आईस म्हणजे इनकम टॅक्स, सीबीआय आणि इडी असा होतो. यावेळी सुळे यांनी वृत्तपत्रही दाखवले आणि त्यात पहिल्या पानावरील बातमीचा संदर्भ आणि राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकचा रेफरन्सही त्यांनी दिला आहे.












Click it and Unblock the Notifications