Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्थिती काय? पहा पहिल्या तासांत काय घडले

Maharashtra Assembly Election Results 2024- महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार टक्कर बघायला मिळाली. झारखंडमध्ये दोन टप्प्यात ८१ जागांसाठी, तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी ही निवडणूक झाली. काल निकालापूर्वी या दोन्ही राज्यांतील वातावरण तापले होते. सत्ता कुणाची येणार हे समजण्यापूर्वीच दोन्ही गटांकडून आपापल्या आमदारांसाठी रणनिती तयार करण्यात आली आहे. आज सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली असून कोण आघाडीवर आहे त्याचा थोडा आढावा...

start of counting of votes in the first hour

महाराष्ट्रात विक्रमी मतदान

यावर्षी महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्या मुख्य लढत झाली. शिवसेना व त्यांनंतर राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या दोन्ही गटांकडून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ६५.१ टक्के मतदान झाले. हा आकडा गेल्या तीस वर्षांतील विक्रमी आकडा ठरला. आता हा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

झारखंडमध्ये ६८ टक्के मतदान

झारखंडमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांसाठीचे मतदान पार पडले. १.२३ कोटी मतदारांपैकी ६८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी ६६ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. उद्या म्हणजेच शनिवारी झारखंड विधानसभेच्या ८१ जागांचा निकाल हाती येणार आहे. वाढलेल्या मतदानापासूनच तेथे सत्ता कुणाची येणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोण पुढे कोण मागे वाचा..

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या एक तासांत महायुती १२५ तर महाविकास आघाडी १०६ जागांवर आघाडीवर आहेत. ही निवडणूक अटीतटीची झाल्याने प्रत्येक फेरीत कल बदलताना दिसत आहे. पहिल्या फेरीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. येवल्यात अजित पवार गटाचे छगन भुजबळ पिछाडीवर गेले आहेत. तेथे माणिकराव शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. बारामतीत पहिल्याच फेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर आहेत. तेथे युगेंद्र पवार पिछाडीवर गेले आहेत. घाचकोपरमध्ये भाजपचे राम कदम आघाडीवर आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+