राज ठाकरे यांनी भेट नाकारली, सदा सरवणकर माहीमधून निवडणूक लढवणार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणकीचा प्रचार आता रंगात आला आहे. माहीम विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे आता माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आज उमेदवारी अर्ज घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यतचा वेळ होता.
शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. पण राज ठाकरे यांनी सरवणकर यांची भेट नाकारली आहे. त्यामुळे आता माहिम विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार हे आता निश्चित झालं आहे.

माध्यमांशी बोलताना सदा सरवणकर यांनी सांगितले की, मी आज राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. पण राज ठाकरे यांनी भेट नाकारली त्यामुळे मी निवडणूकीतून माघार नसल्याचा प्रश्नच येत नाही, असं सदा सरणवकर यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना सरवणकर म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होतं. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलो होतो. राज ठाकरे यांना भेटून नाकारली त्यामुळे ही निवडणूक मी लढणार आहे, असं सरवणकर यांनी सांगितलं आहे.
अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडून येणे कठीण आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवणे, कसे गरजेचे आहे, हे समीकरण मी राज ठाकरे यांना समजावून सांगणार होतो. त्यासाठी मी राज ठाकरे यांची भेट वेळ मागितली होती, पण आता त्यांनी भेट नाकारली आहे. त्यामुळे माझ्या सारखा कार्यकर्ता आता काय करणार असा प्रश्न ही सरदा सरवणकर यांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications