सुप्रिम कोर्टाकडे ठाकरेंच्या वकिलांनी केली 'ही' मागणी, मिळाला दिलासा! धनुष्यबाणावर या दिवशी सुनावणी
Shiv Sena UBT demands hearing on symbol dispute before local election : स्थानिक निवडणुकांपूर्वी धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर तातडीची सुनावणी घ्या अशी मागणी आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली. युबीटीच्या वकिलांची बाजू ऐकून आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर १४ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगत हे प्रकरण या दिवसासाठी सुचीबद्ध केले आहे. यासंदर्भात एनआयने वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रातील दोन शिवसनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर दाखल अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जोरकसपणे बाजू मांडली. एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शिवसेना युबीटीतर्फे दाखल याचिकेवर ही सुनावणी झाली. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह प्रकरणात आता १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
लाईव्ह लाॅनुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर आंशिक कामकाजाच्या दिवशी हा विषय नमूद केला आणि या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात तातडीने सुचिबद्ध करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) वकीलांनी ७ मे रोजी जेव्हा हा मुद्दा नमूद करण्यात आला तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने तातडीने सुनावणीची विनंती फेटाळून लावली होती असे सांगितले.
The Supreme Court hears a plea by Shiv Sena (UBT) seeking directions against the decision of the Election Commission regarding the party’s symbol dispute between two factions.
— ANI (@ANI) July 2, 2025
Counsel appearing for Shiv Sena (UBT) faction stated that once elections will be notified in the… pic.twitter.com/Tu0NjBn4QM
यावर ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत म्हणाले की, न्यायमूर्ती कांत यांच्या खंडपीठाने सुट्टीच्या काळात या प्रकरणाचा उल्लेख करण्याची परवानगी दिली होती. कामत यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख केला, ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ मे रोजी अधिसूचित करण्यात आल्या. त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादाच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या अंतरिम व्यवस्थेच्या धर्तीवरच अर्ज दाखल करण्यात आला आहे, असेही लाईव्ह लाॅ च्या वृत्तात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला अधिकृत चिन्हाचा वापर हा न्यायालयीन प्रकरण आहे अशी जाहिरात करण्याचे निर्देश दिले होते. अखेर, कामत यांच्या मोठ्या युक्तिवादानंतर, खंडपीठाने १४ जुलै रोजी प्रकरण सुचीबद्ध करण्याचे मान्य केले.
हेही वाचा : राज-उद्धव ठाकरे एकत्र लढू शकतात महापालिका निवडणुका! कुणाला होणार जास्त फायदा? जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications