Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बापरे! "किचनमध्ये शिळे अन्न, उंदीर अन् माती"- मारहाणीवर शिवसेना आमदार संजय गायकवाड काय म्हणाले? वाचा

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad's explanation : कँटीन कामगाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर आज बुधवारी, ९ जुलै २०२५ रोजी स्पष्टीकरण दिले. कॅन्टीनमधील जेवणाबद्दल याआधीही तक्रारी केल्या होत्या आणि कर्मचाऱ्यांना दर्जेदार अन्न देण्यासाठी वारंवार विनंत्या केल्या पण त्यांनी ऐकले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी आज एनआयशी बोलताना दिले.

आमदार गायकवाड यांनी सांगितले की, शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या आमदाराने आमदार निवासात कँटीनचालकाला मारहाण केल्याचा कथित प्रकार व्हिडओतून समोर आला आहे. शिळा भात आणि डाळ दिल्याचा आमदार संजय गायकवाड यांचा आरोप होता. त्यांना जेवण दिल्यानंतर ते निकृष्ट होते म्हणून मारहाणीचा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे, हा प्रकार ८ जुलैला आकाशवाणी येथील आमदार निवासात घडला.

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad s explanation

दरम्यान, या आमदाराने गरीब असहाय व्यक्तीला मारहाण केल्याचे म्हटले जात असून हा प्रकार पाहून सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत बनियान आणि टाॅवेलवर येत आमदार गायकवाड कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत.

आमदार संजय गायकवाडांचे स्पष्टीकरण काय?

एनआयच्या वृत्तानुसार, संजय गायकवाड म्हणाले की, "मी गेल्या ३० वर्षांपासून आकाशवाणी कॅन्टीनमध्ये येत आहे आणि गेल्या वर्षांपासून येथे राहतो. मी वारंवार त्यांना चांगले जेवण देण्याची विनंती केली आहे. अंडी १५ दिवसांची, मांसाहारी १५-२० दिवसांची, भाज्या २-४ दिवसांची. जवळजवळ ५,०००-१०,००० लोक येथे खातात आणि प्रत्येकाची एकच तक्रार आहे. कोणाच्या जेवणात सरडा आहे, तर कोणाच्या जेवणात उंदीर किंवा दोरी आहे," असा संतप्त आरोप संजय गायकवाड यांनी केला. त्यांनी असेही सांगितले की त्यांनी मंगळवारी रात्री १० वाजता जेवणाची ऑर्डर दिली होती आणि कर्मचाऱ्यांना जेवणाच्या दर्जाबद्दल तक्रार केली होती.

"समजावून सांगण्याची माझी स्वतःची पद्धत"

संजय गायकवाड म्हणाले की, " त्यांना समजावून सांगण्याची माझी स्वतःची पद्धत आहे..." त्यांनी पुढे आरोप केला की स्वयंपाकघरात उंदीर फिरत आहेत आणि या समस्येवर उपाययोजना करायला हव्यात. "दरवर्षी, सरकारकडे हजारो तक्रारी येतात आणि मला माहित नाही की त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, त्याची चौकशी का केली जात नाही? स्वयंपाकघरात उंदीर आणि घाण असते... याची तपासणी केली पाहिजे, परंतु कोणीही काळजी घेत नाही... लोकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून मी त्यावर कारवाई करण्याची विनंती करते." असेही त्यांनी एनआयशी बोलताना म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

आमदार निवासातील कँटीनमध्ये मंगळवारी बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवण मागवले. त्यांना जेवण देण्यात आले पण त्यात डाळ आणि भात शिळा होता आणि त्याचा वासही येत होता, असा त्यांचा दावा आहे. यानंतर आरोप करत आमदार गायकवाड यांनी कँटीनचालकाकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी त्यांनी तक्रार करत कुणीही कँटीनचे बील देऊ नका असे म्हटले आणि कँटीनच्या काऊंटरवर बसलेल्या चालकाच्या मारहाण केली. या घटनेनंतर, शिवसेनेच्या यूबीटी खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+