CM पदासाठी नाही तर गृहखात्यावरुन खदखद सुरु? वाचा महायुतीतील पडद्यामागची बातमी
A tug-of-war for the post of Home Minister- महायुतीतील तिन्ही नेत्यांची सध्या दिल्लीत बैठक सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व राष्ट्र्वादीचे नेते अजित पवार यांना आमंत्रित केले आहे. या बैठकीत सीएम पदासाठी नाही तर गृहमंत्री पदासाठी रस्सीखेंच सुरु असल्याच्या बातम्या काही मिडिया हाऊसने दिल्या आहेत. भाजप व शिवसेना हे दोघेही या खात्यासाठी आग्रही असल्याची चर्चा रंगली आहे.

गृहखात्यावरुन गरमागरमी सुरु ?
मुख्यमंत्रीपदाचा व खातेवाटपाचा पेच सोडविण्यासाठी महायुतीचे नेते सध्या दिल्लीत आहेत. सध्या भाजप व शिंदे गटात गृहखात्यावरुन वाद सुरु असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी सात वर्षे हे खातं सांभाळलं आहे त्यामुळे भाजप या खात्यासाठी आग्रही आहे. मात्र सीएम पद भाजपला दिल्यामुळे शिवसेनेने या खात्यावर हक्क सांगितला आहे. भाजपनेही गृहखातं स्वतःकडे ठेवत इतर खाते शिंदे गट व अजित पवार गटाला ऑफर केले असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे हा पेच गृहमंत्री अमित शहा कसा सोडवतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
गृहखातं भाजपसाठी महत्त्वाचं
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 10 वर्षांपैकी साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहखातं सांभाळलं होतं. शिवाय त्यांच्या कार्यकाळात एकदाची या खात्यावर आरोप झालेले नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच हे खातं सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, असं भाजपचं म्हणणं आहे. दुसरीकडे मविआच्या सत्तेच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे खातं सांभाळलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हे खातं राजकारणात महत्त्वाचं समजलं जातं. त्यामुळेच भाजप या खात्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय.
अजित पवारांकडे अर्थखातं राहील?
भाजप आणि शिंदे गटात गृहखात्यावरुन वाद सुरु असल्याचं समजतंय. तर दुसरीकडे अर्थखातं हे अजित पवारांकडेच राहण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्याकडे गेल्यावेळीही अर्थ खात्याची जबाबदारी होती. ती त्यांनी सक्षणपणे सांभाळली. त्यामुळे यावेळीही हे खातं त्यांच्याच वाट्याला येण्याच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे गृहखातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ खातं जाईल का? ही चर्चा सध्या सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications