शरद पवारांनी जावई अन् नातीसोबत घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
Sharad Pawar : देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेला लालबाग राजा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गजबजून गेलं आहे. लालबागमध्ये देश-विदेशातून भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील गणपती मंडळांमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी गणपतीच्या तिसऱ्या दिवशी, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले.
जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्याच्या दर्शनला पोहचले. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनालाही शरद पवार यांनी हजेरी लावली होती.

पवारांनी अनेक वर्षांनतर घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
शरद पवारांनी अनेक वर्षांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. यापूर्वी ज्यावेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी घेतले होते. त्यानंतर अनेक वर्षांनंतर आज शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहचले. लालबागच्या राजाच्या मंडळानं कोरोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होते त्यावेळी शरद पवार आले होते. मात्र, त्यावर्षी कोरोना संकटामुळे गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे दर्शन घेता आले नाही.
आज अमित शहा घेणार लालबागच्या राजाचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. अमित शहा आज सोमवारी सकाळी 10:45 वाजता देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जातील. यानंतर 11.15. च्या सुमारास एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जातील. त्यानंतर दुपारी 12.10 मिनिटांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतील.
दिग्गजांनी घेतले दर्शन
यंदाच्या गणेशोत्सावात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांनी तर मुकेश अंबानी यांनीदेखील सहकुटुंब लालबाग राजाचं दर्शन घेतले आहे. याशिवाय सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावली आहे.












Click it and Unblock the Notifications