शाहरुखला ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून बेड्या, कोण देत होतं धमकी? वाचा
Shah Rukh Khan death threat case : बॉलिवूडचा किंग खान आणि असंख्य चाहत्यांच्या हृदयांची धडकन असलेला अभिनेता शाहरुख खान याला ठार मारण्याची धमकी काही दिवसांपुर्वी दिली गेली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
छत्तीसगडमधील रायपूर येथून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर शाहरुख खानकडे 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना, रायपूर, छत्तीसगड येथील रहिवासी असलेल्या फैजान नावाच्या वकिलावर लक्ष केंद्रित केले होते, कारण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना रायपूर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे तपासात पुढे आले होते. त्याच्या नावावर एक संशयित काॅलचा नंबरही आढळला आहे. रायपूर येथील पंढरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या फैजानला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
दुसऱ्या दिवशी आपला फोन चोरीला गेल्याचे फैजानने पोलिसांना सांगितले आणि त्याने रायपूरमधील खमहर्डीह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन तासांच्या चौकशीदरम्यान फैजानने पोलिसांना सांगितले आणि त्याचा दावा आहे की, धमकीच्या कॉलमागे त्याच्याविरोधात कट होता आणि शक्यतो कोणीतरी त्याच्या चोरीला गेलेल्या फोनचा गैरवापर केला आहे. "ज्याने माझ्या फोनवरून फोन केला, त्याने हे जाणूनबुजून केले आणि मला वाटते की हे माझ्याविरुद्ध कट असू शकतो अशीही त्यांची बाजू आहे.
शाहरुखचा 'अंजाम'बनला गळ्यातला फास!
फैझान म्हणाला की तो राजस्थानचा आहे आणि बिश्नोई समुदायाच्या हितांबद्दल जागरूक आहे, ज्यांच्यासाठी हरणांचे संरक्षण करणे हा धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. त्याने शाहरुख खानच्या 1994 मध्ये आलेल्या 'अंजाम' या हरणांच्या शिकारीवरील एका डायलॉगवर आक्षेप घेतला होता. शाहरुख खानला धमकावल्याबद्दल मुंबई पोलिसांना धमकावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 308(4) आणि 351(3)(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलम 308(4) हत्येची धमकी किंवा गंभीर दुखापत करण्यासह खंडणीशी संबंधित आहे, तर कलम 351(3)(4) मध्ये गुन्हेगारी धमकीचा समावेश आहे.
शाहरुखला कधी मिळाली धमकी?
सात दिवसांपूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:21 वाजता वांद्रे पोलिसांना एक फोन आला, ज्यामध्ये कॉलरने प्रथम शाहरुखचे लोकेशन कन्फर्म केले. त्यानंतर त्याने मला 50 लाख रुपये दिले नाहीत तर मी जीवे मारेन, अशी धमकी दिली होती.
फैजानच्या अटकेचा आणि धमकीच्या कॉलचा तपास अजूनही सुरूच आहे. धमकीच्या कॉलमागील खरा गुन्हेगार कोण याचा शोध घेण्यासाठी पोलिस या प्रकरणातील कटाच्या कोनातूनही तपास करत आहेत. शाहरुख खानच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांनी दक्षता घेतली आहे.












Click it and Unblock the Notifications