महाराष्ट्रात पुन्हा संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती; सरपंचाचा मुंडकं छाटलेला मृतदेह आढळला!
Sarpanch Killed as like Santosh Deshmukh in Lonar Crime News : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजलं. त्यानंतर आता देशमुख यांच्या निर्घृण हत्येसारखीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या शहरात झाल्याचे समोर आले आहे. एका माजी सरपंचाची निघृण हत्या करण्यात आलेली आहे. त्यांचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या भागात सापडला असून मुंडक नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

नेमकं काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनमधून त्यांचं अपहरण झालं. त्यानंतर महिनाभर ते गायब होते. त्यानंतर आता लोणार पोलीस स्टेशनच्या एक किलोमीटरच्या अंतरावर त्याचे मुंडकं छाटलेला मृतदेह सापडला आहे.
जीवाला धोका असल्याच्या दिल्या होत्या तक्रारी!
दरम्यान त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या एका वर्षात आठ तक्रारी दिल्या होत्या. त्यामुळे ते मिसिंग झाल्यानंतर पीडित कुटुंब तीन वेळा पोलीस स्टेशनला गेलं होतं. त्यांनी आरोप केल्यापैकी एक आरोपी गेल्या महिन्याभरापासून फरार आहे. किरकोळ जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे.
पँथर सेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा!
याबाबत ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते दीपक केदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, या घटनेवर विधानभवनात कोण बोलणार आहे की नाही?, गरीब वंजारा समाजाचा कुणीच वाली नाही. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ या प्रकरणात गांभीर्याने चौकशी करावी. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेत त्यामध्ये आणि सीआयडीमार्फत चौकशी करावी. त्याचबरोबर वंजारी समाजाचे नेते भाऊ-बहीणसुद्धा यामध्ये भूमिका घेतील आणि कुटुंबाला न्याय देतील.












Click it and Unblock the Notifications