VIDEO : पैशांनी भरलेली बॅग, संजय शिरसाट यांचा खळबळजनक व्हिडिओ, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्याचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते बेडवर बसलेले दिसत असून, त्यांच्या शेजारी पैशांनी भरलेली भासणारी एक मोठी बॅग ठेवलेली आहे. व्हिडीओमध्ये ते सिगारेट ओढत फोनवर बोलताना दिसतात. या व्हिडीओवरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या व्हिडीओनंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची पुनः चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी याच दिवशी असा दावा केला होता की "शिंदे गटातील मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत."
संजय शिरसाट यांची स्पष्ट प्रतिक्रिया
व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, "हा व्हिडीओ माझ्याच बेडरूमचा आहे. मी तिथे बसलोय, शेजारी माझा आवडता कुत्रा आहे. आणि ती जी बॅग दिसते आहे, ती फक्त कपड्यांची आहे. जर मला पैसे लपवायचे असते, तर मी ती बॅग उघड्या जागेत ठेवली असती का? कपाटं काय मेलीत आहेत का?"
संजय शिरसाट यांनी आरोप फेटाळताना म्हटलं, "हा एक प्रपोगंडा असून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. या व्हिडीओमध्ये काहीही अयोग्य नाही."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 11, 2025
स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत?
हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस!
@Dev_Fadnavis pic.twitter.com/9PH2HDH5IW
संजय राऊतांवर पलटवार
संजय शिरसाट पुढे म्हणाले, "संजय राऊत हे ठरवून दररोज काहीतरी बोलतात. त्यांनी आजही भुंकण्याचं काम केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेले, अमित शाह यांची भेट घेतली आणि काही घडामोडी घडल्या की यांना लगेच प्रतिक्रिया द्यायची गरज वाटते."
त्यांनी टोला लगावत पुढे म्हटलं, "राऊत यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकनाथ शिंदेंचंच भूत झपाटलेलं आहे. सत्ता गेल्याचं दु:ख अजूनही त्यांना अस्वस्थ करतं आहे."
व्हिडीओबाबत आणखी स्पष्टीकरण
शिरसाट यांनी म्हटलं, "हा व्हिडीओ माझ्या मतदारसंघात काढलेला आहे. मी कोणालाही चिठ्ठी देऊन घरात बोलवत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी नेहमी खुले राहा हे शिकवलं, तीच भूमिका आजही मी निभावत आहे. कोणी हा व्हिडीओ काढला असेल, पसरवला असेल, तरी त्यात गैर काहीच नाही."












Click it and Unblock the Notifications