Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मंत्री संजय शिरसाट यांना मोठा धक्का; आयकर विभागाची नोटीस, विट्स हॉटेल प्रकरणावरून कारवाईची शक्यता

राज्यातील महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वादग्रस्त विट्स हॉटेल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस मिळाल्याचे बोलले जात आहे. खुद्द संजय शिरसाट यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात याबाबत खुलासा केला आहे.

sanjay shirsat income tax notice

संजय शिरसाट यांची कबुली - "ब्लॅक मनी आता चालणार नाही"

शिरसाट यांनी एका कार्यक्रमात भाष्य करताना सांगितले की, "आता काळ्या पैशांचा जमाना संपला आहे. पैसे कमावणे सोपे आहे, पण ते योग्यरित्या वापरणे खूप कठीण झाले आहे." यावेळी त्यांनी आयकर विभागाची नोटीस आल्याचे देखील उघडपणे मान्य केले.

त्यांनी पुढे सांगितले की, "2019 मध्ये माझी संपत्ती एवढी होती, तर 2024 मध्ये एवढी कशी झाली, याबाबत विचारणा झाली आहे. 9 जुलैपर्यंत खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे."

विट्स हॉटेल लिलाव प्रकरण काय आहे?

छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या लिलावप्रकरणी मंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप झाले होते. या हॉटेलची बाजारभावानुसार किंमत सुमारे 110 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असताना, केवळ 67 कोटी रुपयांमध्ये हे हॉटेल त्यांच्या मुलाच्या नावावर विकत घेण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता.

प्रकरण गाजल्यानंतर संजय शिरसाट यांनी या टेंडरमधून माघार घेतल्याची घोषणा केली होती. मात्र विरोधकांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात सभागृहात उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करण्याची घोषणा केली होती.

राजकीय परिणामांची शक्यता

विरोधकांच्या आरोपांनंतर आता आयकर विभागाकडून नोटीस आल्याने संजय शिरसाट यांच्या संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका मंत्र्याविरोधात चौकशी समितीच्या आदेशानंतर लगेचच आयकर विभागाने कारवाई केल्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.

या घडामोडींमुळे शिंदे गटासह संपूर्ण महायुती सरकारमध्ये तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी गटाच्या प्रतिमेवर आणि अंतर्गत गटबाजीवर याचा काय परिणाम होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+