Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संभाजीनगर मध्यच्या रणांगणात प्रदीप जैस्वाल पुन्हा मारणार बाजी?; धार्मिक मत विभागणीमुळे पारडे जड

Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्याच्या बहुतांश विभागाने शिवसेनेला चांगली साथ दिली. विशेषतः छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्हा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसून आले. या जिल्ह्याच्या राजकारणाचा प्रभाव मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यावरही दिसून आला. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण या मुद्द्यावरूनच तरुणांचे ताफेच्या ताफे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती गोळा झाले. अशा ताफ्यातील एक तडफदार तरुण होता प्रदीप जैस्वाल.

वयाचे 25 पासूनच प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेनेतून काम करण्यास सुरुवात केली. महानगरपालिका कार्यक्षेत्रात ते विशेषत्वाने कार्यरत होते. शिवसेनेचे नगरसेवक आणि महापौर म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिवसेनेचे खासदार म्हणूनही त्यांची एक टर्म पूर्ण झाली आहे. 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते तसेच राज्याचे माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आणि तेव्हापासून शिवसेना आणि प्रदीप जैस्वाल यांच्या अंतर निर्माण झाले.

Pradeep Jaiswal

आपल्याला शिवसैनिकानी पराभूत केले असा आरोप प्रदीप जैस्वाल यांनी केला. त्याचा परिणाम म्हणून 2009 साली त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही. चिडलेल्या जैस्वाल यांनी पक्षाचे तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर तिकिटासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला आणि शिवसेना सोडली. 2009 साली त्यांनी अपक्ष म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती विजयी देखील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो सफल झाला नाही. त्यांनी काँग्रेसला समर्थन दिले मात्र काँग्रेसने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे वैतागून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

२०१४ साली पराभव

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेने कडून छत्रपती संभाजी नगर मध्ये विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. पण त्यावेळी युती तुटली होती. भाजपचे किशनचंद तनवाणी रिंगणात होते. छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचे मतदान जवळपास 38 ते 40 टक्के इतके आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची मते विभागली गेली आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे 20 हजारांच्या फरकाने विधानसभेत निवडून गेले. जलील यांना 61 हजार मते मिळाली तर जैस्वाल आणि तनवाणी यांच्या मतांची बेरीज 81000 च्या आसपास झाली होती. मत विभाजनाचा फायदा जलील यांना मिळाला.

२०१९ साली काढले पराभवाचे उट्टे

2019 साली पुन्हा शिवसेना भाजपा युती झाली आणि शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल यांना छत्रपती संभाजी नगर मध्य विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. तब्बल 82 हजार मते घेऊन प्रदीप जैस्वाल यांनी विजय मिळविला तर प्रतिस्पर्धी एमआयएमच्या उमेदवारांची मते देखील वाढली आणि ती 61 हजार वरून 68 हजार वर पोहोचली होती. अशा रीतीने प्रदीप जैस्वाल शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले.

एकनाथ शिंदे यांना साथ

2022 साली शिवसेनेत जो उलटफेर झाला त्यात अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून देण्यात आले. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले. कालांतराने अजित पवार देखील राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या शिवसेनेचे आमदारांमध्ये प्रदीप जैस्वाल यांचाही समावेश होता

एकनाथ शिंदे यांनी प्रदीप जैस्वाल यांना खूप मदत केली. नगर विकास विभागाकडून छत्रपती संभाजी नगर मध्य मतदारसंघाच्या विकासासाठी 80 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला यापैकी 20 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून 60 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. मतदार संघाच्या पर्यटन दृष्ट्या विकासासाठी बीबी का मकबरा ते लेण्यांपर्यंत रस्ता पूर्ण करण्यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आणि पुटील ते जत वाडा या रस्ता रुंदीकरणासाठी आठ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. सध्या या कामापैकी पुलाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून रस्त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

विविध योजनांची अंमलबजावणी

छत्रपती संभाजी नगर मध्य मतदारसंघातील नागरिकांसाठी अण्णा भाऊ साठे शहरी दलित गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी एकनाथ शिंदे आणि मंजूर केला यात रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था निर्मितीचाही समावेश आहे. यापैकी तीन कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली असून तीन कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. छत्रपती संभाजी नगर मध्य मध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 1680 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली असून नवी जलवाहिनी तसेच पाण्याच्या टाक्या बसविण्यात येत आहेत.तसेच मतदार संघातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसीला बेरोजगार तरुणांची माहिती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 200 वर्ष जुन्या खांबा नदी पुलासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसेच अत्याधुनिक पोलीस ठाण्यासाठी तसेच विविध विभागांच्या कार्यालयांसाठी आणि पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी 191 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 500 महिला वाहन चालकांना इ रिक्षा देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजी नगर मध्य हा शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा मतदार संघ आहे. धार्मिक मत विभाजनामुळे तो धार्मिक अस्मितेचाही विषय होतो. कोणत्याही परिस्थितीत हा मतदार संघ जिंकून आणण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते आणि नेते जीवाचे रान करीत आहेत. मतदारसंघाचे राजकीय चित्र पाहता प्रदीप जैस्वाल यांचा विजय तुलनेने अधिक सोपा आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+