Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मंजुळा गावित : साक्रीमधून दुसऱ्या विजयासाठी सज्ज; पाच वर्षात विकासकामांचा धडाका

Maharashtra Assembly Election 2024 : आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी मंजुळा गावित या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षात मंजुळा गावीत यांनी धडाक्याने विकासाची कामे केली. त्यांना या निवडणुकीत काँग्रेस आणि बंडखोर उमेदवारांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

मंजुळा गावित पूर्वी भाजपमध्ये होत्या. 2019 साली त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. महिला आणि बालकल्याण विभागाच्या समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2022 साली शिवसेनेत झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडात गावीत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. एकनाथ शिंदे पुढे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांचे राजकारण अडचणीत आले. शिवसेनेचे 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. पक्षाचे अधिकृत चिन्ह आणि पक्ष संघटना देखील एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मंजुळा गावी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना अपेक्षेप्रमाणे साक्री विधानसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली.

Maharashtra Assembly Election 2024

विकासकामांचा धडाका

गेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंजुळा गावित यांनी मोठ्या प्रमाणात निधी आपल्या मतदार संघात खेचून आणला. विकासाची विविध कामे त्यांनी राबवली. मतदारसंघात प्रचंड जनसंपर्क निर्माण केला. आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्यामुळेच त्यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे. साक्री विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. एकमेव स्ट्रॉंग उमेदवार असल्यामुळे त्यांना संधी दिल्याचे मानले जाते.

शैक्षणिक सुविधा निर्मितीकडे कल

आदिवासी बहुल आणि दुर्गम असलेल्या आपल्या मतदारसंघात शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याकडे मंजुळा गावित यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या पाठपुराव्यातून भांडे ग्रामपंचायत हद्दीतील 16 एकर जमीन एकलव्य निवासी इंग्रजी माध्यम प्रशालेला देण्यात आली. ट्रायबल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने त्याचे संचालन करण्यात येते. त्यांच्याच पाठपुराव्यातून शिक्षणाचे डिजिटायझेशन करण्याकडे लक्ष देण्यात आले आणि कुडाशी तसेच आंबे पाडा येथील अंगणवाडी शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षणाच्या संदर्भात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आली.

आरोग्य केंद्राची निर्मिती

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नजीक घोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली तसेच नवापाडा येथेही प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मलमाथा विभागात जैताना येथे ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे आणि त्यासाठी पाच एकर जमीन देण्यात आली आहे. या रुग्णालयाची पूर्ण क्षमता पंधरा वरून शंभर बेड पर्यंत देण्यात येणार आहे.सिंचनाच्या सुविधेला प्राधान्य देताना कुंभरे आणि उभारती येथे कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे तसेच ब्राह्मणवेल येथे विद्युत प्रकल्पाची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कुंभरे आणि उभारती यांना जोडणाऱ्या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही गावातील अंतर तब्बल दहा किलोमीटरने कमी झाले आहे.

सिंचन प्रकल्प पूर्णत्वास

मंजुळा गावित यांच्या प्रयत्नातूनच मेहेरगाव लघु सिंचन प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे आणि त्याचा दहा ते बारा खेड्यांना लाभ होत आहे. विशेष करून शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जात असून प्रकल्पाला 36 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 20000 लोकांना या प्रकल्पाचा लाभ होत आहे. जैताणे, मानाजी पाडा, अमोडे, नावडणे, बोधगाव, समोदे , पिंपळनेर, माळ्याचा पाडा, दरेगाव, केवडीपाडा, आणि टेक पाडा येथे समाज मंदिरांची उभारणी करण्यात येत आहे. तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध सुधारणांची कामे करण्यात येत असून तेथे पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत आणि त्या अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहे.

तब्बल ६३ हजार लाडक्या बहिणी

साक्री विधानसभा मतदारसंघात मंजुळा गावित यांच्या कार्यकर्त्यांचे भक्कम नेटवर्क आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण साखरे विधानसभा मतदारसंघात करण्यात आली आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघातून तब्बल 63 हजार 718 महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. ही संख्या खूप मोठी आहे. साक्रीसारख्या आदिवासी बहुल भागाचा विचार करता मंजुळा गावित यांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेच्या लाभ आपल्या मतदारसंघात पोहोचवला आहे.

मंजुळा गावित यांची लढत काँग्रेस आणि स्थानिक बंदरांची होणार असली तरी विकास कामे, संघटन, जनसंपर्क त्याच्या जोरावर त्या पुन्हा बाजी मारतील अशी चर्चा आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+