Sahitya Akademi : ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार, वाचा त्यांचा प्रवास
प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने 21 भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये मराठीतील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीने 21 भाषांमध्ये 8 काव्यंसग्रह, तीन कादंबरी, 2 लघुकथा संग्रह, 3 साहित्य समीक्षक, 1 नाटक आणि एक संशोधनासाठी पुरस्कार दिला. बंगाली, डोगरी आणि उर्दू भाषेसाठीचे पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीने सांगितलं आहे.

8 मार्च 2025 रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. 8 मार्च 2025 रोजी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
कोणा कोणाला मिळाला पुरस्कार?
आसामी भाषेत समीर तांती, बोडो- अरोन राजा, इंग्लिश -इस्टरिन किर, गुजराती - दिलीप झवेरी, हिंदी - गगन गिल , कन्नड- केव्ही नारायणा, काश्मिरी-सोहन कौल, कोंकणी-मुकेश थाली, मैथिली - महेंद्र मलांगिया, मल्याळम - जयकुमार, मणिपूरी - हाओबम सत्यवती देवी, मराठी-सुधीर रसाळ, नेपाळी - युवा बराल, ओडिया - वैष्णव चरण समल, पंजाबी - पॉल कौर, राजस्थानी-मुकुट मनिराज, संस्कृत - दीपक कुमार शर्मा, सैंतली - महेश्वर सोरेन, सिंधी - हुंदराज बलवानी, तामिळ - एआर व्यंकटचलपथी, तेलुगु - पेनुगौंडा लक्ष्मीनारायण
कोण आहेत सुधीर रसाळ?
डॉ. सुधीर रसाळ यांना 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षणात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधीर रसाळ हे सध्या 91 वर्षांचे असून या वयातही अलिकडेच त्यांच्या 16 व्या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलंय. तसंच प्राध्यापक म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी शासकीय कला महाविद्यालय आणि मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं.
डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. ते 1956 पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. रसाळ हे सन 1990 ते 1993 या काळात औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख होते.
रसाळ यांचे कविता व लिखान
कवितानिरूपणे
काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली
ना.घ. देशपांडे यांची कविता
मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण
मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप
मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्म वाङ्मय
लोभस : एक गाव काही माणसंं (व्यक्तिचित्रे)
वाङ्मयीन संस्कृती
समीक्षक भालचंद्र नेमाडे
साहित्य अध्यापन आणि प्रकार : सहसंपादन (प्रा. वा. ल. कुलकर्णी गौरवग्रंथ)
पुरस्कार व मानसन्मान
अशोक कीर्तकीर पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे दिला जाणारा गौरवमूर्ती पुरस्कार
चारठाणकर प्रतिष्ठानचा पुरस्कार
मराठवाडा साहित्य परिषदेचा १ला जीवनगौरव पुरस्कार
प्रा. रा.श्री. जोग पुरस्कार
पद्मजा बर्वे पुरस्कार
'वाटा कवितेच्या' कार्यक्रमात दिला जाणारा, परभणीच्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा २०१४ सालचा शब्द सह्याद्री साहित्य सन्मान
साहित्य समीक्षा पुरस्कार
अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्कार (२०२१)
विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा साहित्य अकादमी पुरस्कार












Click it and Unblock the Notifications