रिसोड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी देतायेत लढत
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राला तरुण राजकारण्यांची मोठी परंपरा लाभली आहे. विशेषतः शिवसेनेने तरुणांना अधिक संधी दिली. आज आमदारकीची तिसरी किंवा चौथी टर्म गाजवणारे शिवसेनेचे आमदार पहिल्या टर्मला 35 किंवा चाळिशीत होते. आमदारकीप्रमाणेच खासदारकीसाठीही शिवसेनेने तरुणांना पसंती दिलेली दिसते.
1999 पासून 2024 पर्यंत सलग 25 वर्षे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात तरुण खासदार म्हणून भावना गवळी यांची ओळख आहे. वयाच्या 26 व्या वर्षीपासून त्या लोकसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. सध्या त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. आणि त्या विधानसभेच्या रिंगणात देखील उतरत आहेत.

भावना गवळी या यवतमाळ वाशिम मधील शिवसेनेचे नेते पुंडलिकराव गवळी यांच्या कन्या. जिल्ह्यात पुंडलिकराव गवळी यांनी शिवसेनेची चांगलीच बांधणी केली. संघटनेचा विस्तार करण्यात पुंडलिकराव गवळी यांचा मोठा वाटा आहे. 1999 साली भावना गवळी यांना लोकसभेसाठी पहिल्यांदा तिकीट देण्यात आले आणि त्या विजयी झाल्या. 1999 ते 2000 या काळात त्या संसदेच्या वाणिज्य समितीच्या सदस्य होत्या. 2002 -2001 या काळात त्यांनी महिला सक्षमीकरण समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. 2004 साली सलग दुसऱ्या वेळी त्यांचा विजय झाला. 2007 ते 2009 या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्य होत्या.
2009 साली राज्यभरात काँग्रेसची लाट असतानाही त्यांनी सलग तिसऱ्या वेळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला. याच वर्षी त्यांना परिवहन पर्यटन आणि संस्कृती समितीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या लाटेत त्यांना पुन्हा खासदारकीची संधी मिळाली. सप्टेंबर 2014 मध्ये मानव संसाधन विकास आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्य पदी त्यांना नियुक्त करण्यात आले..
नरेंद्र मोदींनी 2014 प्रमाणेच 2019 आली ही आपली लोकप्रियता कायम ठेवली. तशीच यवतमाळ लोकसभा मतदारसंघात भावना गवळी यांची लोकप्रियताही कायम राहिली आणि 2019 मध्ये त्या 17 व्या लोकसभेसाठी पाचव्यांदा निवडून गेल्या. सप्टेंबर 2019 मध्ये पुन्हा आरोग्य व कुटुंब कल्याण स्थायी समिती सदस्य पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर 2020 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर त्या सदस्य होत्या.
2022 मध्ये शिवसेनेत जी उलथापालथ झाली आणि ज्यात शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. आधी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. नंतर शिवसेनेच्या 13 खासदारांनीही एकनाथ शिंदे यांनाच पाठबळ दिले. या 13 खासदारांमध्ये भावना गवळी यांचाही समावेश होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. पण त्यांचे पुनर्वसन करताना त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आले. आता रिसोड विधानसभा मतदारसंघातून त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
भावना गवळी यांना पुंडलिकराव गवळी यांचा जसा वारसा लाभला आहे तशीच पंचवीस वर्षांच्या खासदारकीची प्रदीर्घ कारकीर्दही लागली आहे. प्रचंड जनसंपर्क, आक्रमक स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य, प्रशासनावर मांड ही भावना गवळी यांची वैशिष्ट्ये आहेत. जिल्ह्याच्या जनमानसावर देखील भावना गवळी यांची मजबूत पकड आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे नुकसान होणार नाही असा शब्द दिलेला असल्यामुळे शिंदे भावना गवळी यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करणार हे जवळपास स्पष्ट आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारने चांगलीच पेरणी केलेली आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील राज्य सरकारने या मतदारसंघात विकासाची अनेक कामे राबवली आहेत. बंजारा समाज हा या मतदारसंघातील मोठ्या संख्येने असलेला समाज असून, पोहरादेवी हे या समाजाचे आराध्य दैवत आहे. पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज भवन सरकारच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. या भावनासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परिसरातील बंजारा समुदायासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट असून त्यांच्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध करण्यात आले आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार संघातील मालेगाव तालुक्याला 45 कोटी रुपये खर्चाची पिण्याच्या पाण्याची योजना महायुती सरकारने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे या परिसराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चांगला प्रचार रिसोड विधानसभा मतदारसंघात संघटनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
25 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, एकनाथ शिंदे यांनी पाठीशी उभी केलेली ताकद, संघटनेची शक्ती आणि महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली विकास कामे यांच्या जोरावर भावना गवळी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश करतील अशी भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांची खात्री आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी








Click it and Unblock the Notifications