Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pune News: पुण्यात भीषण अपघात, मद्यधुंद कारचालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले, 3 ठार

Pune News Wagholi Kesnand fatal accident : पुण्यात आज सोमवार (ता. 23) सकाळी भीषण अपघात झाला असून फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि त्यांच्या मामाचा समावेश आहे. इतर सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमी सहा जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. डंपरचा चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता. पुणे शहरातील वाघोली चौक परिसरात मध्यरात्री हा अपघात झाला. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune News Wagholi Kesnand fatal accident

अशी आहे मृत आणि जखमींची नावे

विशाल विनोद पवार (22), वैभवी रितेश पवार (1) आणि वैभव रितेश पवार (2) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये जानकी दिनेश पवार (21), रिनिशा विनोद पवार (18), रोशन शशाडू यांचा समावेश आहे. भोसले (9), नागेश निवृत्ती पवार (27), दर्शन संजय वैराळ (18) आणि अलिशा विनोद पवार (47) यांचा समावेश आहे.

संशयित चालकाला अटक

पुणे शहर पोलिसांचे डीसीपी झोन ​​4 हिम्मत जाधव म्हणाले, "पुणे शहरातील वाघोली चौक परिसरात काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास फूटपाथवर झोपलेल्या दोन मुलांसह तिघांना डंपर ट्रकने चिरडून ठार केले, परिणामी त्यांचा मृत्यू झाला." आणि इतर सहा जखमी झाले. मद्यधुंद ड्रायव्हरला मोटार वाहन कायदा आणि BNS च्या संबंधित कलमांखाली पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे."

असा घडला अपघात

वाघोली येथील केसनंद फाट्यावरुन पुण्याकडे एक डंपर येत होता. साधारणतः रात्रीचा एक वाजला असेल त्यावेळी वाघाली चौकात पोलिस ठाण्यासमोर हा प्रकार घडला.

मोलमजुरीसाठी अमरावतीहून आले होते कामगार

अमरावतीहून मोलमजुरीसाठी काही कामगार पुण्यात आले होते. रात्री हे कामगार फुटपाथवर झोपले. तर काहीजण लगतच असलेल्या झोपडीत झोपले होते. त्यावेळी एका कंपनीच्या डंपरने झोपलेल्यांना चिरडले. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : कुर्ल्यातील थरारक अपघातात 7 निष्पापांचा बळी!ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना? संतोष माने प्रकरणाची आठवण

ती रात्र ठरली काळरात्र...

कामासाठी अमरावतीहून स्वप्न घेऊन पुण्याला कामगार आले पण त्यांच्यासाठी 22 डिसेंबरची रात्र काळरात्र ठरली. कुटुंबाला आधार देण्याचा आणि ते पुढे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कामगारांना डंपरने चिरडले. यातच त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण मृत्यूशी झुंज देत आहेत. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, डंपर चालक मद्यधुंद होता.

हेही वाचा : प्रवाशी बोट कशी उलटली, अपघात कसा झाला, 13 जणांच्या मृत्यूला नेव्हीची बोट कारणीभूत आहे का?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+