Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुर्ल्यातील थरारक अपघातात 7 निष्पापांचा बळी!ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना? संतोष माने प्रकरणाची आठवण

Kurla Bus Accident Update : पुण्यातील संतोष माने नावाचा सनकी चालक अन् त्याचा तो राग.. 25 जानेवारी 2012 ची ती सकाळ नऊ जणांसाठी काळरात्र ठरली.. सकाळी स्वागरेट बस स्थानकातून बस सुसाट चालवून घेतलेले नाहक बळी...त्या घटनेची कटू आठवण कुर्ल्यात घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा ताजी झाली. फरक एवढात की, पुण्यातील प्रकार जाणून बुजून होता तर कुर्ला येथे बस अपघात ही दुर्घटना.. पण बळींची संख्या जवळजवळ सारखीच..कुर्ल्यातील अपघातात 7 जणांच्या मृत्यू झाला. या अपघाताला कारणीभूत संशयीत बेस्ट बसचालक संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी रात्री काय घडला प्रकार?

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर लोकांच्या गर्दीत भरधाव बस शिरुन हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत अनेकजण चिरडले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 48 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Kurla Bus Accident update 7 killed Insident due to brake failure

ब्रेक फेल अन् होत्याचे नव्हते..!

प्राप्त माहितीनुसार, बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे कारण समोर आले आहे. हे तपासात आलेले प्राथमिक कारण आहे, पण बसचालक संजय मोरे यानी मद्यप्राशन तर केले नव्हते ना..अशा शंका लोक काढत आहेत. पोलिसांनी काल रात्रीच संजय मोरे यांना ताब्यात घेतले होते. आता त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते की नाही, हे स्पष्ट होईल.

संजय मोरे यांचा फोटो व्हायरल

संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असल्फा परिसरात राहतो असे सांगितले जात आहे. संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान संजय मोरे यांच्या कुटुंबीयांनी तो दारु पीत नसल्याचे सांगितले आहे. संजय मोरे यांनी 10 दिवस ट्रेनिंग घेतले होते. त्यानंतर त्यांना इलेक्ट्रीक बस चालवण्यासाठी देण्यात आली होती.

कसा घडला अपघात..?

प्राप्त माहितीनुसार, 9 डिसेंबरला सायंकाळी जवळपास साठ प्रवाशांनी भरलेली बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जाण्यासाठी निघाली. दरम्यान, अचानक या बसने धडक द्यायला सुरवात केली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं ही बस शिरली. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

पुण्यातील संतोष माने प्रकरण काय आहे?

एसटी बस चालक असलेला संतोष माने 25 जानेवारी 2012 च्या सकाळी पु्ण्यातील स्वागरेट बस स्थानकात आला होता. त्याने आपली रात्रीची ड्युटी बदलून दिवसा द्यावी म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली होती, अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य न केल्याने माने बाहेर निघाला आणि थेट डेपोमध्ये पार्क असलेल्या बसमध्ये जाऊन बसला. आपल्याकडील मास्टर चावीने त्याने बस सुरु केली आणि कोणाच्याही लक्षात येण्याच्या आधी तो ती बस घेऊन थेट रस्त्याच्या विरुद्ध दिशेने स्वारगेटकडून कॅम्पच्या दिशेने निघाला आणि जो दिसेल त्याला धडक दिली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+