सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीला पुण्याने टाकले मागे! ताम्हिणी घाटात यंदा पावसाचा विक्रम
Pune News Tamhini Ghat beats Cherrapunji : पुणे तेथे उणे काय उगाचच म्हणत नाही. पुण्यातील अनेक गोष्टी अशा आहेत ज्या देशात नाहीत. पावसाच्या बाबतीतही पुणे मुंबईपेक्षा काही कमी नाही. अहो मुंबई सोडा चेरापुंजीही गार पडली म्हणावी लागेल. कारण पुण्यातील ताम्हीणी घाटाने चेरापुंजीला मागे पाडले ते कसे हेही समजून घेऊया.
भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो. चेरापुंजी हे जगाच्या नकाशावर यामुळेच आलेले आहे. पण यंदा महाराष्ट्रातील पुण्यालगतच्या ताम्हीणी घाटाने चेरापुंजीला मागे टाकले आहे. यावर्षी ताम्हीणी घाटात रेकाॅर्ड तोड पाऊस झाला आहे. लेटेस्ट लीच्या वृत्तानुसार, पुण्याच्या ताम्हीणी घाटाने चेरापुंजीला मागे टाकले आहे.

किती पडतो चेरापुंजीत पाऊस?
वार्षिक पाऊस नोंदीनुसार, चेरापुंजीमध्ये सुमारे 11,777 मिलिमीटर (463.7 इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो, ज्यामुळे ते भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. पण यंदा चेरापुंजीने मान्सूनमध्ये एक हजार मिलिमीटर पावसाची सरासरीही गाठली नाही. त्या तुलनेत महाराष्ट्रातील ताम्हीणी घाट आणि महाबळेश्वरमध्ये मे महिन्यापासून सतत जोरदार पाऊस पडत आहे असे हवामान विभागाची आकडेवारी सांगते.
सर्वाधिक पावसाचे नवे केंद्र बनतोय पश्चिम घाट!
- हवामान संशोधकांनी नुकताच एक शोधप्रबंध जारी करण्यात आला. यामध्ये म्हटले की, पश्चिम घाटात भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारा भाग म्हणून पुढे येत आहे.
- गेल्याच वर्षी म्हणजे २०२४ मध्ये मावसिनराम येथे ११ हजार मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत ताम्हीणी घाटात जवळजवळ १० हजार ७०० मिलिमिटर पावासाची नोंद झाली.
- यंदा म्हणजेच २०२५ मध्ये माविनरामच नाही तर चेरापुंजीलाही ताम्हीणी घाटाने मागे टाकले आहे.
- चेरापुंजीत मे -जूनमध्ये जवळपास १ हजार मिलिमिटर पाऊस पडला.
- ताम्हीणी घाटात गेल्या २४ तासांतच २१० मिमी पाऊस पडला.
- जून महिन्यात एकूण २,५१५ मिमी पाऊस पडला आहे.
कसे आहे हवामान?
दिल्ली-एनसीआरमध्ये मान्सूनच्या पावसामुळे हवामान आल्हाददायक झाले आहे. सोमवारी दिवसभर अधूनमधून पाऊस पडत होता, तर मंगळवारीही हवामान खात्याने येथे पावसाची शक्यता व्यक्त केली आहे, जरी त्यांनी यलो अलर्ट काढून टाकला आहे, परंतु तरीही ते म्हणते की आजपासून ६ जुलैपर्यंत दिल्ली आणि एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि लोकांना उष्णता आणि आर्द्रतेपासून आराम मिळेल. महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकणसह इतर ठिकाणी आज ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications