कामाच्या ताणाने घेतला जीव! चिठ्ठीतून व्यक्त झाली भावना, बँक व्यवस्थापकाची आत्महत्या, या शहरातील घटना

Pune News Baramati Bank Manager Suicide : पुणे जिल्ह्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. कामाच्या ताणामुळे एका वरिष्ठ बँक व्यवस्थापकाने कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. या घटनेमुळे कामाचा ताण आणि त्यातून मानसिक घुसमट किती गंभीर बाब बनली आहे, याचेच हे द्योतक असल्याचं आता बोललं जात आहे.

"बँक ऑफ बडोदाच्या बारामती सिटी शाखेत ही घटना घडली. या शाखेचे वरिष्ठ मुख्य व्यवस्थापकानेच आपले जीवन संपवल्याने बँकींग क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

Pune News Baramati Bank Manager Suicide

यासंदर्भात एनआयशी बोलताना बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली असून, शिवशंकर मित्र असे आत्महत्या करणाऱ्या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे.

बारामतीमधील भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (52 वर्ष) यांनी गुरुवारी (17 जुलै) रात्री बँकेच्या शाखेतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

"बँक ऑफ बडोदाच्या बारामती सिटी शाखेचे मुख्य व्यवस्थापक शिवशंकर मित्र यांनी काल रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये कामाच्या दबावाचा उल्लेख केला असल्याचं पोलिस निरीक्षक नाळे यांनी एनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

पती घरी परतले नाही हे शिवशंकर मित्रा यांच्या पत्नीने आम्हाला कळवले. त्यावर बँकेशी संपर्क साधला तेव्हा कर्मचाऱ्यांनी आत जाऊन तपासणी केली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळले. या प्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे असंही ते म्हणाले.

पँटच्या खिसात सुसाई़ड नोट

शिवशंकर मित्रा यांच्या पँटच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की ते कामाच्या दबावामुळे आपले जीवन संपवत आहेत असं सांगत पोलिस निरीक्षक नाळे म्हणाले की, आम्ही नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे हे टोकाचे पाऊल उचलले याची सखोल चौकशी करत आहोत." मीडिया रिपोर्टनुसार, मित्रा यांनी बँकेला पत्र लिहून कामाचा अतिरिक्त दबाव सहन होत नसल्याने स्वेच्छानिवृत्ती मागितली होती अशी माहिती समोर आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+