Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्याचं राजकारण तापलं! वडगाव शेरीचा 'रणसंग्राम' आणि २०२९ ची नांदी; कोण मारणार बाजी?

पुणे, विद्येचं माहेरघर आणि राज्याचं सांस्कृतिक केंद्र. पण सध्या याच पुण्याच्या हवेत अभ्यासापेक्षा राजकारणाचा धूर अधिक दिसू लागला आहे. निमित्त आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीचं! (Pune Municipal Election) १५ जानेवारीला मतपेटीतून पुण्याचा कौल दिला जाणार आहे आणि १६ जानेवारीला गुलालाची उधळण नेमकी कुणावर होणार, हे स्पष्ट होईल. मुंबईच्या बरोबरीनेच पुण्याची महानगरपालिका जिंकणं हे सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचं बनलं आहे.

pune municipal election vadgaonsheri key players

त्यातही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या वडगाव शेरी (Vadgaon Sheri) विधानसभा मतदारसंघातील प्रभागांच्या निवडणुकीवर. या मतदारसंघातील ही लढाई केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादित नसून, ती २०२९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची जणू 'सेमीफायनल' ठरताना दिसत आहे.

वडगाव शेरीचं रणकंदन: तीन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

वडगाव शेरी हा मतदारसंघ म्हणजे पुण्याचा सर्वात वेगाने विकसित होणारा भाग. आयटी हब, मोठमोठे मॉल्स आणि तितकीच महत्त्वाची असलेली स्थानिक गावांची व्होट बँक. या मतदारसंघावर पकड मिळवण्यासाठी सध्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये 'तुंबळ युद्ध' सुरू आहे.

१. जगदीश मुळीक (Jagdish Mulik)

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे या मतदारसंघातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. भाजपच्या संघटनात्मक बांधणीत मुळीक यांचा मोठा हात आहे. गेल्या काही वर्षांत मतदारसंघात भाजपने जी ताकद निर्माण केली आहे, त्यामागे मुळीक यांची रणनीती महत्त्वाची मानली जाते. यंदा भाजपमध्ये अनेक मातब्बरांनी प्रवेश केल्याने मुळीक यांच्याकडे आता 'दिग्गजांची फौज' तयार झाली आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून पक्षातील आणि मतदारसंघातील आपलं निर्विवाद वजन सिद्ध करण्याचं मोठं आव्हान मुळीक यांच्यासमोर आहे.

२. सुनील टिंगरे (Sunil Tingre)

आपली राजकीय ताकद जमिनीवरून निर्माण केली आहे. स्थानिक प्रश्नांची जाण आणि कार्यकर्त्यांचं जाळं ही टिंगरे यांची जमेची बाजू आहे. मतदारसंघात त्यांचा स्वतःचा असा एक मोठा गट असून, गेल्या विधानसभेच्या अनुभवानंतर टिंगरे अधिक सावध आणि आक्रमक झाले आहेत. अजित पवार गटाची पुण्यातली ताकद दाखवून देण्यासाठी टिंगरे यांच्यासाठी ही महानगरपालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या पक्षाचे किती नगरसेवक या भागातून निवडून येतात, यावर त्यांचं आगामी राजकीय भविष्य अवलंबून असेल.

३. बापू पठारे (Bapu Pathare)

शरद पवार गटाचे 'अनुभवी' सेनापती विद्यमान आमदार बापू पठारे हे या मतदारसंघातील जुने जाणते खेळाडू. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ते प्रमुख आधारस्तंभ आहेत. बापू पठारे यांची ताकद ही त्यांच्या जनसंपर्कात दडलेली आहे. अनेक वर्षांपासून या भागातील राजकारणाचे ते साक्षीदार आणि कर्तेधर्ते राहिले आहेत. मात्र, यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी काहीशी वेगळी आणि आव्हानात्मक ठरणार आहे.

बाप-लेकाची राजकीय विभागणी आणि 'सुरेंद्र' फॅक्टर

या निवडणुकीतील सर्वात मोठा 'ट्विस्ट' म्हणजे बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे (Surendra Pathare) यांनी केलेला भाजप प्रवेश! बापू पठारे हे शरद पवारांसोबत पुढे जात असतानाच, त्यांच्या मुलाने भाजपची वाट धरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला बळ मिळालं आहे, पण यामुळे बापू पठारे यांची कोंडी होणार की ते आपल्या मुलाच्या विरोधात कडवी झुंज देणार? की पडद्यामागून भूमिका बजावणार? हे पाहणं रंजक ठरेल. एकाच घरातून दोन वेगवेगळ्या विचारधारेचे लढे या निवडणुकीला एक वेगळाच 'कौटुंबिक आणि राजकीय' पदर देऊन गेले आहेत.

२०२९ च्या दृष्टीने का आहे ही 'सेमीफायनल'?

तज्ज्ञांच्या मते, जो नेता या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणेल, त्याचा २०२९ च्या विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल.

  • भाजपसाठी संधी: जर जगदीश मुळीक आणि सुरेंद्र पठारे यांनी अपेक्षित यश मिळवलं तर भाजप या मतदारसंघात पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला मजबूत करेल.
  • शरद पवार गटाची कसोटी: बापू पठारे यांच्यासमोर खरे आव्हान आहे. मुलाच्या भाजप प्रवेशानंतर ते आता नेमकी काय भूमिका घेतील हे याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
  • अजित पवार गटाचं अस्तित्व: सुनील टिंगरे यांना आपली वैयक्तिक ताकद आणि पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवून आपणच 'वडगाव शेरीचे खरे किंग' आहोत हे दाखवून द्यावं लागेल अन्यथा त्यांच्यासाठीही धोक्याची घंटा ठरेल.

निकाल काय सांगणार?

१५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी आतापासूनच खलबतं सुरू झाली आहेत. रात्रीच्या बैठका, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आणि वॉर्डमधील समीकरणांची मांडणी वेगात सुरू आहे. वडगाव शेरीचा हा रणसंग्राम पुण्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल. मतदारांचा कल विकासाकडे आहे की जुन्या निष्ठांकडे, हे १६ जानेवारीच्या निकालात स्पष्ट होईल.

या राजकीय रणधुमाळीत कोण कुणाला धक्का देतं आणि कोण आपलं वजन टिकवून धरतं, याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+