पुण्यातील बलात्कार प्रकरणात मोठा खुलासा! चुक कुणाची? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेटच सांगितलं
Pune Crime News : एक गैरसमज तयार केला जात आहे की, घटना परवा सकाळी सहा वाजता घडली पण कालपर्यंत घटना का कळवली गेली नाही, पण मी स्पष्ट करतो की, जी घटना घडली त्यातील आरोपी पळून दूर जाऊ नये यासाठी फक्त गुप्तता पाळली गेली. पोलिसांकडून दुर्लक्ष झाले नाही.
योगेश कदम म्हणाले, स्वारगेट बसस्थानकातील जी घटना घडली त्याची पाहणी करण्यासाठी मी आलो होतो. एकंदरीत सहा वाजता सकाळी ही घटना घडली. फिर्याद नऊच्या सुमारास दाखल झाली. पोलिसांनी आवश्यक कारवाई लगेचच सुरु केली. आरोपीचे फुटेज पाहून आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली. जसे लोकेशन सापडेल तसे पोलिस तपास करत आहेत. जवळपास आठ पथके पोलिसांकडून तयार करण्यात आले आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

तो फक्त गैरसमज..
योगेश कदम म्हणाले, एक गैरसमज तयार केला जात आहे की, घटना परवा सकाळी सहा वाजता घडली पण कालपर्यंत घटना का कळवली गेली नाही, तर यासंदर्भात मी सांगतो की, ज्यावेळी फिर्याद आली त्याच्या अर्ध्या तासातच आरोपीची ओळख पटवली आणि आरोपी अलर्ट होऊ नये यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली गेली आणि ती गरजेची होती.
घटना लपवलेली नाही, गुप्तता पाळली
योगेश कदम म्हणाले, जर त्वरीत ही बातमी बाहेर आली असती तर कदाचित आता जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे ते मिळाले नसते, आरोपी लांब पळून जाण्याची शक्यता आहे. गुप्तता मात्र पाळली गेली घटना लपवलेली नाही.
पोलिसांकडून दुर्लक्ष झाले नाही..
योगेश कदम म्हणाले, पुणे बसस्थानक परिसरात ही घटना घडलेली आहे. या भागात कितीवेळा गस्त घातली गेली याची माहिती मी घेतली आहे. घटनेच्या आधी रात्री दीड वाजता गस्त घातली गेली. तेथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तेथे पाहणी करायला गेले होते रात्री तीनवाजता दुसऱ्यांदाही ते पाहणी करुन गेले आहेत. पोलिसांकडून कोणतेही दुर्लक्ष झालेले नाही.
संशयित आरोपीवर याआधी छोटे मोठे गुन्हे
योगेश कदम म्हणाले, पाच तासांच्या अंतरात पोलिसांची गस्त घटनास्थळी झाली होती. आरोपी जो आहे त्याच्यावर लहान मोठे गुन्हे दाखल आहेत, त्यात चोरीचा एक गुन्हा ग्रामीण भागात दाखल आहे.
खासगी सुरक्षारक्षकाची चूक
एसटी महामंडळाने खासगी सुरक्षारक्षक नियुक्त केलेले असतात. पुण्यातील संबंधित एसटी स्टँडच्या आवारात जी खासगी सुरक्षा असते त्यांनी चुका केल्या आहेत. बसच्या बाजूलाच चौकी होती पण तिथे खासगी सुरक्षारक्षक नव्हते.त्यामुळे ही घटना आरोपीला करायला सोपे होते.












Click it and Unblock the Notifications