प्रेमात अडकवलं, वारंवार अत्याचार अन् दोन वेळा गर्भपात; पुण्यात माजी नगरसेविकेच्या मुलाचे कांड!
Pune Crime News : पुण्यातील माजी नगरसेविकेच्या मुलाकडून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भपात करायला लावल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भवती राहिल्यानंतर तिला धमकावून तिची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात करायल लावल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तरुण हा माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
आळंदीत जाऊन केले लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडितेने गर्भवती असताना तक्रार देऊ नये यासाठी तरूणीला घेऊन जाऊन आळंदीत लग्न केलं, त्यानंतर संमती नसताना 2 वेळा गर्भपात देखील केला. त्यानंतर वारंवार मारहाण करत राहिला, धमकावत राहिला. 2021 पासून सुरू असलेला हा अत्याचार आत्तापर्यंत सुरूच होता. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

आरोपी तरुणाची आई माजी नगरसेविक
संबंधित तरुण हा माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती आहे. याबाबत पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची 2021 साली एका जीममध्ये ओळख झाली होती. पीडित तरुणी व्यवसाय करते. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जायचा.
लग्नाची विचारणा करताच तो टाळाटाळ करू लागला
हळूहळू पिडित तरूणीने आरोपीकडे लग्नाची विचारणा केली, त्यावेळी त्याने टाळाटाळ करायला सुरूवात केली. आरोपीचे अन्य मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणीला होता. याबाबत तिने विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून धमकावलं. तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
गोळ्या देऊन केला गर्भपात
पीडित तरूणी आणि आरोपी यांची 2021 मध्ये एका जिममध्ये ओळख झाली होती. पीडित तरूणीचा व्यवसाय असून दोघांची दिवसेंदिवस मैत्री वाढत गेली. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. त्यानंतर आरोपी तरुणीला घरी भेटण्यासाठी जात होता. काही दिवसांनी पीडितेने त्याला विवाहाबद्दल विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करू लागला.
यादरम्यान त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून तरूणीला तीन वेळा गर्भधारणा झाली होती. यामध्ये फिर्यादीची संमती नसताना 2 वेळा त्याने जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात केला. आता पुन्हा गरोदर असताना तिने तक्रार देऊ नये म्हणून घरच्यांना न सांगता फिर्यादीशी आळंदी येथे लग्न केले. परंतु नांदायला न नेता, तिचा गर्भपात करण्यासाठी तिला वारंवार मारहाण करत आहे, म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.












Click it and Unblock the Notifications