Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुणे अहिल्यानगर नव्या रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट, 38 किमीने कमी होणार अंतर, DPR रेल्वेबोर्डाला सादर

Pune Ahilyanagar new railway route : पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सध्याच्या अहिल्यानगर ते पुणे या दौंडमार्गे असलेल्या रेल्वेमार्गापेक्षा पुणे-अहिल्यानगर या रेल्वेमार्गाचे अंतर ३८ किलामीटरने कमी असेल. यासंदर्भातील डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला असल्याचे सुत्रांनी सांगितले.

नगर ते पुणे या थेट रेल्वेमार्गाची गेल्या अनेकवर्षांपासून नगरकरांची मागणी होती. दरम्यान,या मार्गासंदर्भात डीपीआर आता रेल्वेबोर्डाला सादर करण्यात येत आला आहे, हे या रेल्वेमार्गातील विकासकामांसदर्भात मोठे पाऊल मानले जात आहे. स्थानिक खासदारांसह नगरकरांनी या मार्गासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केलेला आहे. रेल्वेमार्ग व्हावा म्हणून नगरकरांची मोठी स्वप्नं होती. खासदार निलेश लंकेंडकडूनही संसदेत यांनीही संसदेमध्ये तसेच केंद्र सरकारकडे या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता.

Pune Ahilyanagar new railway route

कसा असेल रेल्वे मार्ग?

या प्रकल्प अहवालानुसार, हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल.
नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे हे अंतर ३८ किलोमीटरने कमी होईल.
सध्या दौंड मार्गे नगरचे अंतर १५४ किलोमीटर इतके आहे.
आता हेच अंतर ११६ किलोमीटरवर येणार आहे, म्हणजेच ३८ किमी अंतर कमी होईल.

किती खर्च आहे अपेक्षित

अहवाालानुसार या मार्गासाठी सुमारे ११ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसोबतच रेल्वेच्या दृष्टीकोनातूनही तो फायदेशीर राहील असा अभिप्राय या प्रकल्प अहवालात देण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचीही तरतुद प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे.

पुणे-नगरदरम्यान कोणती असेल रेल्वेस्थानकं?

हा रेल्वेमार्ग ११६ किलोमीटर लांबीचा असून नगर ते पुणेदरम्यान ११ रेल्वे स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्यासाठी ११ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित असून पुणे-वाघोली-शिक्रापुर, रांजणगांव, कारेगांव, शिरूर, सुपा, चास- केडगांव या मार्गाने हा रेल्वेमार्ग अहिल्यानगर रेल्वेस्थानकाशी जोडला जाणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+