Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांच्या पत्नीला सुरक्षारक्षकांनी रोखलं, बारामती टेक्सटाईलमधील प्रकार पहा नेमकं काय घडलं

Maharashtra Assembly Election 2024- विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार आज घडला. टेक्सस्टाईल पार्कच्या सुरक्षा रक्षकांनी पवार यांची कार रोखली. जवळपास अर्धा तास प्रतिक्षा करुनही प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाता आलं नाही. त्या प्रवेशद्वारावर उभ्या राहिल्या. त्यांच्यासोबत त्यांची नात रेवती सुळेदेखील होत्या. घटनेची माहिती खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Pratibha Pawar

पार्कच्या गेटवर नेमकं काय घडलं

शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आज बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये गेल्या होत्या. प्रवेशद्वारावर गेट आहे. तेथे सुरक्षा रक्षकही आहेत. मात्र प्रतिभा पवार व रेवती पवार यांची कार कार गेटवर रोखण्यात आली. सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारला. आम्हाला आत सोडू नका, यासाठी सीईओंचा फोन आला होता का? असा प्रश्न प्रतिभा पवार यांनी सुरक्षा रक्षकांना विचारले. मात्र या प्रश्नाचं उत्तर सुरक्षारक्षकांनी दिलं नाही. प्रतिभा पवार यांना टेक्सस्टाईल पार्कच्या प्रवेशद्वारावर का रोखण्यात आलं, त्यांना प्रवेश का नाकारण्यात आला, या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत.

कोण आहे टेक्सटाईल पार्कचं अध्यक्ष

बारामती टेक्सस्टाईल पार्कच्या अध्यक्षा या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या आहेत. सध्या बारामती मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांच्या विरोधात उभा असलेल्या युगेंद्र पवार यांचा प्रचार सध्या प्रतिभा पवार करत आहेत. युगेंद्र पवार त्यांचे काका अजित पवारांविरोधात निवडणूक लढवत असून सगळं पवार कुटुंब सध्या प्रचारात उतरलेलं दिसत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारात उतरलेल्या प्रतिभा पवार सध्या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. रेवती सुळेदेखील युगेंद्र पवारांचा प्रचार करत आहेत. या दोघीही आज टेक्सटाईल पार्कला गेल्या होत्या. मात्र त्यांना तेथे प्रवेश नाकारल्याने या प्रकरणाच्या चर्चा वाढल्या आहेत.

अजित पवारांचं कालचं स्टेटमेंट चर्चेत

प्रतिभा पवार यांच्याबाबत कालच अजित पवार यांनी स्टेटमेंट केलं होतं. प्रतिभा काकी पहिल्यांदाच प्रचारात दिसत असून, आपण निवडणूक झाल्यावर याबाबत त्यांना विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज लगेच त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्यानं चर्चा रंगली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+