महाविकास आघाडीला ना चाके, ना ब्रेक! ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची चढाओढ- धुळ्यात PM मोदींचा घणाघात
PM Narendra Modi Dhule Speech Criticizes On MVA : "महाविकास आघाडीला ना चाके आहे ना ब्रेक! ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची त्यांच्यात चढाओढ असून चारही बाजूंनी कर्णकर्कश हॉर्न वाजत आहेत," अशा शेलक्या शब्दात भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
नरेंद्र मोदी यांची आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील पहिली सभा धुळे येथे आज पार पडत आहे. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर आज त्यांनी शरसंधान साधले. टीका करताना त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीत भांडणं, रस्सीखेच आणि चढाओढ असल्याचा आरोप केला आहे.

आम्ही जनतेला देवाचे रुप मानतो
महाराष्ट्रातील धुळे येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ड्रायव्हरच्या सीटवर म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी मविआत भांडण होत आहे. आमच्यासारखे लोक जनतेला देवाचे रूप मानतात असेही ते म्हणाले.
मविआचे जनतेला लुटण्याचे मनसुबे
नरेंद्र मोदी म्हणाले, जनतेची सेवा करण्यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्याचबरोबर काही लोकांच्या राजकारणाचा आधार 'जनतेची लूट' आहे. जनतेला लुबाडण्याचे मनसुबे असणारे महाआघाडीसारखे लोक सरकारमध्ये आले की विकास थांबवतात आणि प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात.
जनसेवा हेच आमचे धोरण
पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकारणात आल्यावर प्रत्येकाचे स्वतःचे ध्येय असते. आमच्यासारखे लोक जनतेला देवाचे रूप मानतात. जनतेच्या सेवेसाठी आपण राजकारणात आलो आहोत. त्याचबरोबर काही लोकांच्या राजकारणाचा आधार 'जनतेची लूट' आहे.
महाराष्ट्र सरकारसोबत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पुर्ण होण्यासाठी मी मदत करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्याचे वर्णन खूप चांगले केले. हे शहर टेक्सटाईल्सचे मोठे केंद्र आहे. धुळ्याला कनेक्टीव्हीटीची गरज आहे. धुळ्याच्या पायाभूत सुविधांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. धुळे सोलापूर रस्त्याचे काम सुरु आहे हेही त्यांनी म्हटलं
नरेंद्र मोदी म्हणाले, पीएम किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि महायुती सरकारचे नमो शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार वेगळे असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. महायुती सरकारने या रक्कमेला पंधरा हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
काँग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी खड्डे खोदले पण आम्ही हे पैसे देऊन शेतकऱ्यांसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजवत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications