PM मोदींचा मला फोन! मराठीत बोलू की हिंदीत? राज्यसभा सदस्यत्वाचा किस्सा ऐका उज्ज्वल निकमांच्या तोंडून
PM Modi called Ujjwal Nikam : सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ तथा महाराष्ट्रातील माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती नामानिर्देशीत खासदार म्हणून आज चौघांची नियुक्त करण्यात आली. यामध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा गुन्हेगार कसाबला फासावर लटकवण्यात मुख्य भूमिका त्यांनी बजावली होती.
राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी एनआयने बातचित केली. त्यावेळी त्यांनी आपल्याला पहिला फोन कुणाचा आला अन् त्यावेळी काय प्रसंग होता आणि काय हास्यकल्लोळ घडला यावर सविस्तर माहिती दिली.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?
उज्ज्वल निकम म्हणाले, माझा लोकसभेला पराभव झाला, त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील जनतेला दुखः झाले होते. त्यांना आज राष्ट्रपती महोदया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी दिली. लोकसभा प्रचारावेळी पंतप्रधान मोदी मला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विश्वास व्यक्त केला होता, त्यामुळे मी खूपच भाऊक झालो होतो. काल त्यांचा मला काॅल आला.
उज्ज्वल निकमांनी काय सांगितला किस्सा?
राज्यसभेचे खासदार होण्याची मोठी बातमी उज्ज्वल निकमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन दिली. उज्ज्वल निकम म्हणाले, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या नामांकनाबद्दल माहिती देण्यासाठी मला फोन केला. त्यांनी मला विचारले की त्यांनी हिंदीत बोलावे की मराठीत. आम्ही दोघेही हसायला लागलो. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की, आपण दोन्ही भाषा चांगल्या पद्धतीने जाणून आहात, तर त्यांनी माझ्याशी पहिल्यांदा मराठीत बोलले आणि मला सांगितले की राष्ट्रपती मला जबाबदारी देऊ इच्छितात, त्यानंतर त्यांनी मला राष्ट्रपतींच्या निर्णयाची माहिती दिली. मी लगेच हो म्हटले. मी पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो..."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितले की, राष्ट्रपती महोदया तुमच्यावर एक जबाबदारी सोपू इच्छितात, तुम्ही ती घेणार का, मग त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची जबाबदारीबद्दल माहिती दिली आणि म्हटले की, देश आणि संविधानासाठी तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल...मी त्यावर हो म्हणालो असे निकम म्हणाले.
उज्ज्वलजी लाईफ मे ऐसा होता हैं..
उज्ज्वल निकम यांनी म्हटले की, माझा जेव्हा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी मला म्हणाले की, उज्ज्वलजी लाईफ मे ऐसा होता हैं..पण मी तो पराभव विसरुन गेलो आणि केसेस लढण्यात व्यस्त होतो. मी सुरुवातीपासून मी जेव्हा वकीलीची प्रॅक्टीस केली ती आरोपींच्या विरोधातच केली, मी सुरुवातीला पब्लिक प्रोस्युक्योटर म्हणून ओळखला जातो.. म्हणून देश आणि संविधानाविरोधात हालचाली करणारे, खून करणारे त्यांच्याविरोधात मी खटले लढतो या कारणामुळे राष्ट्रपतींनी माझ्यावर विश्वास टाकला.
उज्ज्वल निकमांनी मानले राष्ट्रपतींचे आभार
राज्यसभेवर नामांकन मिळाल्याबद्दल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणतात, "मला नामांकन दिल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो... असे म्हणत त्यांनी या संधीबद्दल आपण खूश असल्याचे सांगितले.












Click it and Unblock the Notifications