Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हिंदू समुदायासाठी खास झटका मटन, महाराष्ट्रात 'मल्हार सर्टिफिकेशन' सुरू,जाणून घ्या त्याबद्दल सर्वकाही

Maharashtra 'Malhar' Certification : महाराष्ट्राचे राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी 'मल्हार सर्टिफिकेट' नावाच्या एका नवीन उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत राज्यभरात झटका मटण विकणाऱ्या दुकानांची नोंदणी केली जाईल. हे प्रमाणपत्र मिळणारी दुकाने केवळ हिंदू समुदायातील लोक चालवतील, असं म्हटलं आहे.

मंत्री नितेश राणे यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, "आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस. आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम(http://malharcertification.com) या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व १०० टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही.

Nitesh Rane

मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असा आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित, असं ट्टिटमध्ये मंत्री राणे यांनी म्हटलं आहे". त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भारतात आधीच अस्तित्वात असलेल्या हलाल प्रमाणपत्राप्रमाणेच मल्हार प्रमाणपत्र सुरू करण्यात आले आहे, ज्यामध्ये मांस इस्लामिक कायद्यानुसार (शरिया) तयार केले जाते. झटका मटण त्या पद्धतीपेक्षा वेगळा आहे कारण यामध्ये प्राणी एकाच फटक्यात वेदनारहित मारला जातो.

मल्हार सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्म देखील लाँच होणार

मंत्री राणे यांनी 'मल्हार सर्टिफिकेशन' नावाच्या नवीन प्लॅटफॉर्मच्या लाँचची घोषणाही केली. त्यांनी सांगितले की, हे व्यासपीठ फक्त हिंदू खटिक समुदायाचे लोक चालवतील. ते म्हणाले, "आज आम्ही महाराष्ट्रातील हिंदू समुदायासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या उपक्रमाद्वारे झटका मटण विकणारी प्रमाणित दुकाने हिंदू समुदायाला उपलब्ध करून दिली जातील."

मल्हार प्रमाणपत्राशिवाय दुकानातून मटण खरेदी करू नका

मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समुदायाला मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानांमधूनच मटण खरेदी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "हे मल्हार प्रमाणपत्र शक्य तितके वापरले पाहिजे. मी सर्वांना आवाहन करतो की मल्हार प्रमाणपत्राशिवाय दुकानातून मटण खरेदी करू नका. जय श्री राम!"

मल्हार सर्टिफिकेशन वेबसाइट काय म्हणते?

मल्हार सर्टिफिकेशनची अधिकृत वेबसाइट स्वतःला "झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांसाठी प्रमाणित व्यासपीठ" म्हणून वर्णन करते. वेबसाइटनुसार, "हिंदू धार्मिक परंपरेनुसार तयार केलेले बकरी किंवा मेंढीचे मांस. हे मांस केवळ हिंदू खाटीक समुदायातील विक्रेत्यांकडून पुरवले जाते." तसेच वेबसाइटमध्ये असे नमूद केले आहे की, त्यांचे मांस "ताजे, स्वच्छ, लाळेपासून मुक्त आहे आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नाही." आता महाराष्ट्रातील लोकांकडून या उपक्रमाला किती पाठिंबा मिळतो आणि मांस बाजारावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+