नागपुरचे नगरसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; जाणून घ्या- देवाभाऊंचा राजकीय जीवनप्रवास!
Fadnavis' life journey- देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता आात वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशा शक्यता वाढल्या आहेत. एक सामान्य नगरसेवक ते मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीसांचा प्रवास अगदीच रंजक आहे. काय आहे हा प्रवास, हेच आपण आज जाणून घेणार आहोत...

भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष
महाराष्ट्रात सलग तीन टर्म देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने निवडणुका लढवल्या. २०१४ साली फडणवीसांनी महाराष्ट्रात १२३ आमदार निवडून आणले होते. त्यानंतर २०१९ साली फडणवीसांनी १०५ आमदार निवडून आणले होते. आता २०२४ साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने 132 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्यााच मान मिळवला आहे. सलग तीन टर्म शंभरी पार करण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. त्यामुळे यंदाही मुख्य़मंत्री पदाच्या रेसमध्ये तेच अव्वल होते.
लवकरच होईल शपथविधी
महाराष्ट्रात लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राजभवनावर गेले होते. तेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा गेली तर ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळतील.
नगरसेवक ते मुख्यमंत्री
नागपूर महापालिकेतून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. अवघ्या २१ व्या वर्षी ते नगरसेवक झाले होते. मग सर्वात तरूण महापौर असल्याची मानही फडणवीसांनाच मिळाला आहे. महापौर झाल्यानंतर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले. भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळलं. 2014 ला अवघ्या 44 व्या वर्षी ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कमी वयात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवारांनंतर ते दुसरे नेते ठरले. 2019 ला महाविकास सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. तेव्हाही दीड दिवसांचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर एक रेकाँर्ड झाला आहे.
प्रशासनावर आहे पकड
देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ला मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. तसंच 2022 पासून त्यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांची प्रशासनावर पकड आहे. भाजपच्या राजकीय वाटचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची भूमिका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासू नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा नंबर वरचा आहे. शिवाय प्रशासनाचा अनुभव असल्याने मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस वरचढ ठरतात.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असताना स्व. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा नागपुरातील मुक्काम फडणवीसांकडेच असायचा. या नेत्यांच्या सहवासातच देवेंद्र यांचा पींड घडत गेला. डाऊन टू अर्थ असा त्यांचा जीवनप्रवास राहिला आहे.












Click it and Unblock the Notifications