Nashik News : मुलाचा वाढदिवस ठरला अखेरचा! दिंडोरीत दुचाकीच्या धडकेत कार उलटून नाल्यात; 7 जण ठार
Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे भीषण अपघात घडला आहे. कार आणि दुचाकीच्या धडकेत जवळपास सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कार जवळच्या नाल्यात बुडाली आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढला असून हा अपघात खूप भीषण होता असे सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतांमध्ये तीन महिला , तीन पुरुषांसह एका बालकाचा समावेश आहे. दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वणी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर १६ जुलैला मध्यरात्री हा अपघात घडला. या घटनेनंतर घटनास्थळी नागरीक आणि पोलिसांनी धाव घेतली असुन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सर्व मृत हे कोशिंबे देवठाण आणि सारसाळे येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुलाच्या वाढदिवसासाठी कारने कुटुंबिय नाशिकला गेले होते, तेथून परत येताना हा अपघात झाला.
कसा घडला अपघात (Nashik Accident News update)
प्राप्त माहितीनुसार, अल्टो कार रस्त्याने येत असताना दुचाकी आणि कारची धडक बसली. यानंतर कार जवळच्या नाल्यात उलटली. पाण्यात बुडाल्याने आणि नाका-तोंडात पाणी जाऊन या सात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यातआले आहे. तर दुचाकीस्वार दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात देविदास गांगुर्डे, मनीषा गांगुर्डे, उत्तम जाधव, अलका जाधव, दत्तात्रय वाघमारे, अनुसया वाघमारे आणि भावेश गांगुर्डे यांचा मृतात समावेश आहे तर अपघातात मंगेश कुरघडे आणि अजय जगन्नाथ गोंद हे दोघे मोटरसायकलवरील दोघे जखमी झाले आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अल्टो कार मधील व्यक्तींचा मृत्यू हा अपघातापेक्षा पाण्याने भरलेल्या नालीत कार कोसळल्याने बुडून मृत्यू झाला असा पोलिसांचा प्राथमिक कयास व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांमध्ये आणि गावात हळहळ व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications