Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"कितीही मंत्रिपदं आली अन् गेली मी संपलो नाही"- छगन भुजबळ, वाचा अधिवेशनाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nagpur Winter Session 2024 Updates : "किती मंत्रिपदे आली आणि गेली, पण छगन भुजबळ संपला नाही" असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपद न मिळाल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा होत आहे. तर दुसरीकडे विधानसभेचे अधिवेशन आज पासून सुरु झाले आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासाठी एक मंत्रिपद राखीव ठेवण्यात आल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी आज 16 डिसेंबर रोजी केला.

विधीमंडळ अधिवेळनाच्या सकाळच्या सत्रात अमोल मिटकरी यांनी हे भाष्य केले. त्यासह 15 डिसेंबर रोजी कालच्या शपथविधी कार्यक्रम पार पडला. यात छगन भुजबळ यांना पक्षाने मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगत होती, यावर खुद्द छगन भुजबळ यांनी वक्तव्य केले आणि आपण संपलेलो नाही असेही स्पष्ट केले.

Nagpur Winter Session 2024

काय म्हणाले छगन भुजबळ?

मंत्रि‍पदाची संधी हुकल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, "मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय? काय फरक पडतो.. मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं.. छगन भुजबळ संपला नाही. ज्यांनी मला डावललं त्यांना फोन करून विचारा. मी कोणाशी चर्चा केलेली नाही. माझ्या लोकांबरोबर चर्चा करेन. माझ्या मतदारसंघातील लोकांशी आणि समता परिषदेतील लोकांशी चर्चा करेन " असे त्यांनी म्हटले यावरुन ते पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

नागपुरात 33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्र्यांची शपथ: फडणवीस सरकारमध्ये 2 DCM, 4 महिला मंत्री, वाचा यादी

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, विरोधकांचा ठिय्या

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली, आज पहिल्याच दिवशी सर्व विरोधी आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर ईव्हीएम मशीन घेऊन निदर्शने केली, सर्व आमदार हातात फलक घेऊन निषेध करत होते आणि ईव्हीएम हटाओ, लोकशाही वाचवा, अशा घोषणा देत होते.

आमदारांच्या हातात ईव्हीएमची प्रतिकृती होती ज्यावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची छायाचित्रे लावून विरोध करत होते ईव्हीएम, लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएम काढून बॅलेट पेपरने मतदान करावे लागेल, असे विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर सुमारे १० मिनिटे ठिय्या आंदोलन करीत होते .

Chandrasekhar Bawankule Biography : मंत्रिपदाची शपथ घेतलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजकीय प्रवास

हिवाळी अधिवेशन अपडेट्स

  • विधानसभेच्या कामकाजाला वंदे मातरम आणि राज्य गिताने सुरुवात झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला.
  • यावर्षीच्या पुरवणी मागण्या उदय सामंत यांनी सभागृहात सादर केल्या.
  • यानंतर काँग्रेसचे नाना पटोले यांनी परभणी बीड मधील हिंसाचाराच्या घटना बद्दल या सभागृहात सरकारने उत्तर देण्याची मागणी केली. स्थगन प्रस्तावाबद्दल सूचना अध्यक्षांनी नाकारल्या
  • मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य : परभणी आणि बीड मधील दोन्ही घटना या गंभीर असून, विरोधकांनी या घटनेचा राजकारण न करता विधायक सूचना या सभागृहात चर्चेदरम्यान कराव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
  • चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेच्या पटलावर आठ विधेयके सादर केली.
  • यानंतर विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा आणि विधान सभा सदस्य दिनकरराव जाधव यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडले आणि सभागृहात ते स्वीकृत केले .
  • विधानसभेचे आजच कामकाज स्थगित, विधान परिषदेच्या कामकाजाला दुपारी पुन्हा सुरुवात

विधान परिषदेत काय घडलं?

विधान परिषदेत 289 चा माध्यमातून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी बीड मधील हत्या प्रकरण संदर्भातील प्रश्न सभागृहात मांडला.

दानवेंच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड हत्या प्रकरणी उत्तर देताना संगितले की, बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. आणखी काही आरोपींना अटक केले जाईल. या घटनेत जे जे सहभागी आहे त्यांना शोधून काढून आरोपींना अटक केली जाईल . असे सांगितले. तसेच हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले असून एसआयटीचे गठन केली जाणार आहे. तशा सूचना प्रशासनाला दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+