नागपुरात 33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्र्यांची शपथ: फडणवीस सरकारमध्ये 2 DCM, 4 महिला मंत्री, वाचा यादी
Maharashtra Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 महिला आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी मुंबईत संपन्न झाला होता. त्यानंतर, सर्वांचं लक्ष लागलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच मुहूर्त अखेर आज संपन्न झाला.

मुख्यमंत्र्यांसह एकूण 42 मंत्री
राज्यातील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री, दोन उपख्यमंत्री आणि 39 मंत्री असे एकूण 42 मंत्र्यांचा शपधविधी संपन्न झाला आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 43 आहे, त्यामुळे, अद्यापही एक जागा शिल्लक असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, 42 मंत्र्यांमध्ये 4 महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर, 39 कॅबिनेट व 6 राज्यमंत्री आहेत. अद्याप खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे, नेमकं कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चार महिला मंत्री
महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी मिळणार असे सांगितले जात होते. त्यानुसार, आज 4 लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी मिळाली असून 2 नवे चेहरे मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत.
पर्वती मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. तर, परभणी जिल्ह्याील जिंतूर मतदारसंघाती भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
याशिवाय, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी दोन्ही अनुभवी महिला नेत्यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, आदिती तटकरे यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. भाजपकडून 3 आणि राष्ट्रवादीकडन 1 महिला नेत्यांना संधी मिळाली आहे.
या आमदारांना मिळाली पहिल्यांदा संधी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात यंदा तिन्ही पक्षांनी नव्या चेहऱ्यांना प्राधान्याने संधी दिली आहे. त्यामध्ये, भाजपने साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांना संधी दिली असून कणकवलीतून नारायण राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनाही संधी मिळाली आहे.
तसेच योगेश कदम यांनाही शिवसेनेनं मंत्री करुन कोकणात आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. यांसह अनेक नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळालं असून पुण्यातून माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या लाडक्या बहिणींनाही मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
संपूर्ण मंत्रिमंडळाची यादी
मुंबईतील पहिला शपथविधी सोहळा
देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे : उपमुख्यमंत्री
अजित पवार : उपमुख्यमंत्री
नागपूर 2024 झाली नवीन मंत्रिमंडळामध्ये खालील मंत्री महोदयांनी घेतली शपथ
कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे
2.राधाकृष्ण विखे पाटील
3.हसन मुश्रीफ
4.चंद्रकांत पाटील
5.गिरीश महाजन
6.गुलाबराव पाटील
7.गणेश नाईक
8.दादाजी भुसे
9.संजय राठोड
10.धनंजय मुंडे
11.मंगलप्रभात लोढा
12.उदय सामंत
13.जयकुमार रावल
14.पंकजा मुंडे
15.अतुल सावे
16.अशोक उईके
17.शंभूराज देसाई
18.आशिष शेलार
19.दत्तात्रय भरणे
20.अदिती तटकरे
21.शिवेंद्रराजे भोसले
22.माणिकराव कोकाटे
23.जयकुमार गोरे
24.नरहरी झिरवाळ
25.संजय सावकारे
26.संजय शिरसाट
27.प्रताप सरनाईक
28.भरत गोगावले
29.मकरंद पाटील
30.नितेश राणे
31.आकाश फुंडकर
32.बाबासाहेब पाटील
33.प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री
34. माधुरी मिसाळ
35. आशिष जयस्वाल
36. तुषार राठोड
37. मेघना बोर्डीकर
38. इंद्रनील नाईक
39. योगेश कदम
पक्षनिहाय मंत्र्यांची यादी
भाजप
देवेंद्र फडणवीस
गिरीश महाजन
चंद्रकांत पाटील
पंकजा मुंडे
राधाकृष्णन विखे पाटील
चंद्रशेखर बावनकुळे
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
जयकुमार रावल
नितेश राणे
शिवेंद्रसिंह भोसले
पंकज भोईर
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
माधुरी मिसाळ
अतुल सावे
संजय सावकारे
आकाश फंडकर
अशोक उईके
जयकुमार गोरे
शिवसेना
एकनाथ शिंदे
संजय शिरसाठ
गुलाबराव पाटील
दादा भुसे
उदय सामंत
शंभूराज देसाई
योगेश कदम
प्रकाश आबिटकर
प्रताप सरनाईक
आशिष जैस्वाल
राष्ट्रवादी
अजित पवार
नरहरी झिरवाळ
हसन मुश्रीफ
अनिल भाईदास पाटील
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
सना मलिक - राज्य
इंद्रनील नाईक - राज्य












Click it and Unblock the Notifications