Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागपूर विदर्भातही भाजपची बाजी, फडणवीसांनी पुन्हा करुन दाखवलं

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024- महाराष्ट्रात सत्तेवर ज्याला बसायचे असते, त्याच्यासाठी विदर्भाचा कौल महत्त्वाचा ठरतो, असा इतिहास आहे. विदर्भातील ६२ जागांवरूनच सत्ताकारण ठरते. याच विदर्भाने आज पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने कौल दिल्याचे दिसत आहे. या मतदारसंघांमध्ये १ हजार ५२२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तरीही मुख्य लढत महाविकास आघाडी, महायुतीमध्ये झाली.

Devendra Fadnavis

स्थानिक मुद्यांवर तापले राजकारण

विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांवरून निवडणुकीचे वातावरण तापविले गेले. या निवडणुकीत सोयाबीनचे कोसळलेल्या दरावरून विरोधकांनी वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. यावर तोड म्हणून महायुतीने सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर देणार असल्याचे जाहीर केले. यावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा दर देण्याची घोषणा धामणगाव रेल्वेच्या सभेत केली. पण, भाजपने काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात ३ हजार ८०० रुपयांचा भाव असल्याचे सांगून हा विषय तापवित ठेवला. जातनिहाय जनगणना, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा तोडणार, संविधान हे मुद्देही काँग्रेसकडून मांडण्यात आले. तर 'अर्बन नक्षल'वरून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक है तो सेफ है', तर योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे,' अशा घोषणा दिल्याने वादही झाला. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा गाजल्या.

विदर्भ महायुतीच्यात बाजूने

दुपारपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार विदर्भाने पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूनेच कौल दिल्याचे दिसले. लाडकी बहिण, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, सोयाबीन दर, पीक विमा यामुळे महायुतीने येथे बाजी मारल्याचे सांगितले जाते. विदर्भातील निकालावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांची ताकद दाखवल्याचे बोलले गेले. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+