नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात कोण वरचढ, फडणवीसांची आमदारकीची वाट सोप्पी की अवघड, वाचा रिपोर्ट
Nagpur South West Assembly Election 2024 Devendra Fadnavis Vs Praful Gudhe Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असून, 288 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत काही ठिकाणी विशेष लक्ष वेधले जात आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात आहेत.
यावेळी फडणवीस यांना कुणबी समाजाच्या कोंडीतून वाट काढावी लागणार आहे. काँग्रेसने याठिकाणी कुणबी (मराठा) समाजातील प्रफुल्ल गुडधे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. प्रफुल्ल हे नागपूरचे पहिले भाजप आमदार आणि माजी मंत्री विनोद गुडधे पाटील यांचे सुपुत्र आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ महिलांच्या वर्चस्वाचा असल्याने 'लाडकी बहीण' योजनेचा फायदा फडणवीस यांना मिळू शकतो, असे विश्लेषकांचे मत आहे.

विजयाचा इतिहास
देवेंद्र फडणवीस हे सलग सहाव्यांदा विधानसभा लढत आहेत. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला आणि तेव्हापासून फडणवीसच विजयी होत आहेत. या आधी ते नागपूर पश्चिममधून निवडून आले होते. 1999 पासून ते आजतागायत विधानसभा निवडणुकीत अपराजित राहिले आहेत.
मागील निवडणुकीतील स्पर्धा
फडणवीस आणि प्रफुल्ल पाटील यांच्यात 2014 मध्येही सामना झाला होता. मात्र, त्यावेळी मोदी लाट असल्याने फडणवीस सहज विजयी झाले. यंदा मात्र, महाविकास आघाडीची ताकद वाढल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण चळवळीचा प्रभाव येथे जाणवतो.
कल कुणाच्या बाजूने?
या मतदारसंघात दलित मतदारांची संख्या अधिक आहे.
दलितांमध्ये नवबौद्ध काँग्रेसकडे झुकलेले आहेत, तर हिंदू दलित भाजप समर्थक आहेत. उत्तर भारतीय मतदारांचा फडणवीस यांना मोठा पाठिंबा आहे.
हेही वाचा : गेल्यावेळी भाजपने तिकीट कापले, यावेळी चंद्रशेखर बावनकुळे निवडून येणार का, जाणून घ्या ग्राउंड रिपोर्ट
कुणाला मिळणार विजयाचा आशीर्वाद?
विदर्भातील कुणबी समाजाने मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती, ज्याचा परिणाम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मताधिक्यावर दिसून आला. आता फडणवीस यांच्यासमोर या मतविभाजनाला संपवण्याचे आव्हान आहे. विश्लेषकांच्या मते, कुणबी समाजातील मतविभाजन भाजपसाठी अडथळा ठरू शकते. दुसरीकडे 'लाडकी बहीण' योजना फायदेशीर ठरणारी, असा अंदाज आहे.

महिलांचा निर्णायक मतदार गट
या मतदारसंघात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. पुरुष मतदार 2,02,298 तर महिला मतदार 2,08,914 आहेत. एकूण मतदार 4,11,241 आहेत. 'लाडकी बहीण' योजनेमुळे महिलांचा कल भाजपकडे राहू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : येवल्यात छगन भुजबळांना कांदा हसवणार, रडवणार की मनोज जरांगे झुंझावणार? वाचा ग्राऊंड रिपोर्ट
जातीय समीकरण असे
या मतदारसंघात जातीनिहाय मतदार पुढीलप्रमाणे आहेत
दलित : 1 लाख
कुणबी: 70,000
ब्राह्मण: 60,000
तेली : 30,000
माळी : 20,000
उत्तर भारतीय : 35,000
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications