Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai weather मुंबईला पावसाचा जबरदस्त तडाखा! 'हा' सबवे बंद; ठाणे अन् पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट

Mumbai weather Heavy rains lash city : मुंबई आणि उपनगर परिसरात आज १५ जुलै रोजी जोरदार पाऊस पडत असून काही भागांना तर पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. अंधेरीतील सबवे बंद झाला असून आयएमडीने ठाणे आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर रायगडसाठी रेड अलर्ट आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Mumbai weather

कुठे सुरु आहे मुंबईत पाऊस?

प्राप्त माहितीनुसार, आज मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जसे की वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि पूर्व उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे तर मुलुंड, विक्रोळी येथे गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस सुरू होता. शहरात पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आता ही वाहतूक गोखले पुलावरून वळवण्यात आली आहे," असे मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट केले.

मुंबईत पुढच्या काही तासांत कसा असेल पाऊस?

पुढील चार दिवसांत मुंबई आणि आसपासच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तूर्त पाऊस सुरु आहे. पुढील ३-४ तासांत मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान मेघगर्जना आणि विजांचा कडकटाट होऊन वारेही वाहू शकतात.

काय आहे जोरदार पावसाचे कारण?

मध्यप्रदेशात कमीदाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे समुद्रात जोरदार वारे वाहत असून कोकण भागातही वारे वेगाने वाहत आहेत. यामुळे पुर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या चोवीस तासात पालघरसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे असे मुंबई हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी म्हटले आहे.

मुंबई, पुण्यात पावसाची स्थिती कशी असेल?

आगामी काळासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट परिसरात सातारा आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोबतच या जिल्ह्यातील काही ठिकाणी वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे, असे मुंबईतल्या हवामानाच्या संदर्भात प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी म्हटले आहे.

सखल भागात जाऊ नका... आयएमडीचा इशारा

आयएमडीने मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच मुंबई, उपनगरात पाऊस पडत आहे, अशा स्थितीत मुंबई पोलिसांनी रहिवाशांना किनारी आणि सखल भागात जाऊ नका असे म्हटले आहे.

हेही वाचा : राज्यात पावसाचा जोर ओसरला! पण या भागात होणार जोरदार विजांचा कडकडाट अन् पाऊस जाणून घ्या हवामान

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+