Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई ठाण्यात आज मुसळधार पाऊस होणार! 4 दिवस समुद्राला मोठी भरती, 26 जुलैला सर्वात मोठी लाट उसळणार

Mumbai Thane, Palghar to receive heavy rain today : राज्यात आणि मुंबईतही पावसाचा जोर कायम असून आज 24 जुलै 2025 रोजीपासून चार दिवस सलग समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे २६ जुलै रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे ४.६७ मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, प्रशासनाकडून सुचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Mumbai Thane  Palghar to receive heavy rain today

(भरती तारीख) (वेळ) (लाटांची उंचीमीटरमध्ये)

२४ जुलै सकाळी - ११.५७ वा. ४.५७
२५ जुलै दुपारी - १२.४० वा. - ४.६
२६.जुलै दुपारी - ०१.२० वा. - ४.६७
२७ जुलै दुपारी - ०१.५६ वा. - ४.६०

सलग तीन दिवसांपासून पाऊस

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. काल पहाटेही पावसाने संततधार सुरु होती आणि दमदार पाऊस झाला. शहर व उपनगरांतील सखल भागात या दरम्यान पाणी साचले. पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतूकही मंदावल्याने प्रवाशांचे हाल झाले. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

२४ तासांसाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट

भांडूप खिंडीपाडा परिसरात मंगळवारी दरड कोसळली. या दरडीसोबत चार घरे तब्बल ५० फूट खाली कोसळली. सुदैवाने, ही घरे पावसापूर्वी खाली करण्यात आल्याने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान हवामान विभागाने येत्या २४ तासासाठी मुंबई, ठाणे व पालघरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळल्या

काल सकाळी ११ वाजताच्या दरम्यान समुद्रात मोठी भरती होती. ४.४० मिटर उंचीच्या लाटा उसळल्या. याचवेळी जोरदार पाऊस कोसळल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. दुपारनंतर पावसाने काहीशी उसंत घेत सरीने कोसळला. पालिकेनेही पाणी भरणा-या ठिकाणी पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा केला.

मुसळधार पावसाच्या धर्तीवर यंत्रणा सज्ज्

मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तीन दिवसांपासून पडणा-या पावसामुळे भांडूप खिंडीपाडा परिसरात मंगळवारी रात्री दरड कोसळली. या दरडीसोबत चार घरे तब्बल ५० फूट खाली कोसळली. अंधेरी सबवेत पाणी साचल्याने सबवे येथील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली. अंधेरी, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवली, घाटकोपर, पवई, चेंबूर शेल कॉलनी, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी, भांडुप, मानखुर्द, कुर्ला आदी सखल भागात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

पावसाची नोंद

शहर - २८.५७ मिमी
पूर्व उपनगर - ३९.५० मिमी
पश्चिम उपनगर - ३५.०९ मिमी

पडझडीच्या घटना -

जोरदार पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या. शहरात ६, पूर्वउपनगरांत २ आणि पश्चिम उपनगरांत ११ अशा एकूण १९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्य़ा. या घटनेत कोणालाही मार लागलेला नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+