Mumbai Rain : मुंबईला पावसाने झोडपले! लोकल रेल्वे सेवेवर परिणाम, रस्ते ब्लाॅक, पाणी साचण्याची भिती!
Mumbai Rain Heavy rain in city affects local train : राज्यात जोरदार पाऊस सुरु असतानाच मुंबईतही आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात सर्वदूर पाऊस पडत असून बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी असाच पाऊस सुरु आहे. याचा परिणाम म्हणून लोकल गाड्या दहा ते वीस मिनिटं उशीराने धावत आहेत तर मुंबईची तुंबई होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

पाणी साचले, रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका!
मुंबईत मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पश्चिम रेल्वे दहा मिनिटे तर मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने धावत आहे.
#WATCH | Maharashtra: Underpass closed due to waterlogging seen as heavy rain lashes Mumbai. Visuals from Andheri East. pic.twitter.com/rEUmiX9iSO
— ANI (@ANI) July 25, 2025
या भागात भरले पाणी
भांडुप, वांद्रे, दादर अंधेरी, माटुंगा, माहीम, कुर्ला, साकीनाका, विद्याविहार, विक्रोळी या भागात पाणी भरल्याने त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे रहदाहीही संथावली असून पावसात सबवे बंद असल्याने अनेकांची फजिती झाली.
#WATCH | Maharashtra: Waterlogging seen as heavy rain lashes Mumbai. Visuals from Andheri East. pic.twitter.com/k4DNyESjw2
— ANI (@ANI) July 25, 2025
मुंबईला ऑरेंज अलर्ट, नोकरदारांचे हाल
हवामान खात्याने मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज दुपारी पाहुणे एक वाजता समुद्राला मोठी भरती असून समुद्रात 4.6 मीटर उंचीच्या लाटा कोणाची शक्यता आहे भरतीच्या काळात दृष्टी झाल्यास मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याचे भीती व्यक्त होत आहे. नोकरी धंदा निमित्त घराबाहेर पडलेला मुंबईकरांचे पावसामुळे हाल होत आहेत.
समुद्रात आजही लाटा उसळणार!
२५ जुलै दुपारी - १२.४० वा. - ४.६
२६.जुलै दुपारी - ०१.२० वा. - ४.६७
२७ जुलै दुपारी - ०१.५६ वा. - ४.६०












Click it and Unblock the Notifications