Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai Pune Weather : 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार! तुमच्या शहरात कसा होणार पाऊस? जाणून घ्या

Mumbai Pune Weather : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजा चांगलाच बरसत असून महाराष्ट्र चिंब झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर आज कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे समुद्रसपाटीलगत वाऱ्याची द्रोणीय रेषा महाराष्ट्र केरळ किनारपट्टी पर्यंत आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पाऊस पडत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

Mumbai Pune Weather

महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस?

आज 25 जुलै आणि उद्या 26 जुलैला कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आज व उद्या ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाट परिसर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात येलो अलर्ट

मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व सोसाट्याचा वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

आज 25 जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे व साताऱ्याच्या घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार व तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट

विदर्भात आज म्हणजेच 25 जुलै रोजी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, काल चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला.

पुणे आणि घाट परिसरात कसा पडेल पाऊस

पुणे व आजुबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काल २४ जुलै रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर आज 25 जुलै आणि उद्या 26 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार

राज्यात आणि मुंबईतही पावसाचा जोर कायम असून आज 24 जुलै 2025 रोजीपासून चार दिवस सलग समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, प्रशासनाकडून सुचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+