Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai New मराठी माणसाला मुंबईत घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई होणार! शंभुराज देसाईंची सभागृहात घोषणा

Mumbai News Action against builder if he refuses to house Marathi person : मुंबई किंवा महाराष्ट्रात मराठी माणसांना घर देण्यास नकार दिला तर संबंधित बिल्डरवर कारवाई करणार असल्याची मोठी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी आज केली. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून आज यासंदर्भात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी हे स्पष्ट केले आहे.

आज विधीमंडळ अधिवेशनाचा दिवस असून प्रश्नोत्तराचे सत्र सुरु आहे. विधीमंडळात सत्ताधारी मंत्र्‍यांना सदस्य तारांकित प्रश्न विचारत असून या प्रश्नांना मंत्री उत्तर देत आहेत. आज ज्यावेळी शंभुराज देसाईंना हा प्रश्न विचारला गेला त्यावर उत्तर देत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

Mumbai News Action against builder

मंत्री शंभुराज देसाई यांना मदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नांद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर शंभुराज देसाई यांनी मराठी माणसांना घर मिळावे हा त्यांचा हक्क आहे आणि इतरांपेक्षा पहिला हक्क मराठी माणसांचा आहे हे त्यांनी यावेळी विधानसभेत स्पष्ट केले आणि नार्वेकर यांच्या प्रश्नावर सभागृहात निवेदन दिले.

काय म्हणाले शंभुराज देसाई?

शंभुराज देसाई म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये सगळ्यात पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे, कुठेही मराठी माणसाचा हक्क डावलला जाणार नाही. मराठी माणसाच्या हक्काचे रक्षण महायुती सरकार करेल,त्यामुळे एखाद्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारले जात असेल तर त्या बिल्डरवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

दरम्यान या उत्तरानंतर देसाई यांना उपप्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये मुंबईतील नवीन इमारतीत मराठी माणसांसाठी 50 टक्के घरांचे आरक्षण ठेवण्याबाबतचा कायदा करणार का? हे आमदार ॲड. अनिल परब, सचिन अहिर यांनी विचारले. त्यावर खोचक टोला लगावत शंभुराज देसाईंनी महाविकास आघाडी सरकारच्या, अडीच वर्षांच्या काळात असा कायदा का केला नाही, असा प्रतिसवाल प्रश्नकर्त्याना केला.

सभागृहाचे काम दहा मिनिटांसाठी तहकूब

मराठी माणूस त्यांचे हक्क, घर नाकारणे आणि मराठी माणसांना मुंबईत घरांचे 50 टक्के आरक्षण या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली. मराठी माणसांना मुंबईत घरांचे 50 टक्के आरक्षण या मुद्द्यावर देसाईंच्या प्रतिसवालावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यावेळी जोरदार खडाजंगी झाल्याने सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

हेही वाचा : तुकडेबंदी कायदा शिथील करणार म्हणजे नेमके काय होणार? समजून घ्या जमीन खरेदी ते रजिस्ट्रीपर्यंतचा फायदा

हेही वाचा : मोठी बातमी! जुनी पीक विमा योजनाच राबवणार! 1 रुपयात पीक विम्यावर कृषिमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+