मुंबईचा महापौर कोणाचा? दिल्लीतून फडणवीसांना 'खास मेसेज'; शिंदेंची अडवणूक की ठाकरेंची 'गुगली'? वाचा
Mumbai mayor bmc election 2026 : "मुंबईचा 'भावी महापौर' भाजपचा की शिंदेंच्या शिवसेनेचा? या वादात आता दिल्लीची एन्ट्री झाली आहे. बहुमताचा ११४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिंदेंच्या २९ हातांची साथ हवी आहे, पण या साथीसाठी शिंदेंनी चक्क 'अडीच वर्षांच्या' महापौरपदाची मोठी किंमत मागितली आहे. मित्रपक्षाच्या या 'बार्गेनिंग'मुळे भाजप बॅकफूटवर गेला असतानाच, उद्धव ठाकरेंनीही पडद्यामागून हालचाली सुरू केल्याने मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे."

महायुतीत एकनाथ शिंदेंकडे 'रिमोट कंट्रोल'
एकनाथ शिंदे यांच्या २९ नगरसेवकांनी या खुर्चीचा 'रिमोट कंट्रोल' आपल्या हातात ठेवला आहे. दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट संदेश धाडला असून, "महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करू नका," असे आदेश दिल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे.
भाजपची भूमिका: "महापौर आमचाच!"
दिल्लीतील भाजप नेतृत्वाचा निरोप स्पष्ट आहे - मुंबईत भाजपने ऐतिहासिक यश मिळवले आहे, त्यामुळे महापौर भाजपचाच असावा ही कार्यकर्त्यांची भावना डावलता येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना हा मुद्दा मित्रपक्षांच्या गळी उतरवण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, ही चर्चा करताना महायुतीत कटुता येणार नाही, याची काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदेंची 'अडीच वर्षांची' अट!
एकनाथ शिंदे यांनी भाजपची बहुमताची (११४) अडचण ओळखून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
- पहिले अडीच वर्षे: शिंदेंच्या शिवसेनेला पहिले अडीच वर्षे महापौरपद हवे आहे.
- समित्यांमध्ये वाटा: स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या वैधानिक समित्यांमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, अशी शिंदेंची मागणी आहे.
- २९ नगरसेवक निर्णायक असल्याने, आमच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा महापौर बसू शकत नाही, हा दबाव शिंदे गट वापरत आहे.
उद्धव ठाकरेंचा 'महापौर' कसा होऊ शकतो?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ६५ जागा आहेत. त्यांचा महापौर बसवण्यासाठी खालील 'राजकीय चमत्कार' घडू शकतात.
१. शिंदे गटाची मदत (अप्रत्यक्ष)
जर भाजपने शिंदेंची मागणी मान्य केली नाही आणि शिंदे गट मतदानाला अनुपस्थित राहिला किंवा त्यांनी महाविकास आघाडीला (काँग्रेस+ठाकरे+पवार) साथ दिली, तर समीकरण बदलू शकते.
२. महाविकास आघाडीची एकजूट
काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने साथ दिल्यास ठाकरे गट १०० च्या जवळ पोहोचतो. अशा वेळी त्यांना अपक्ष किंवा लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल.
३. तटस्थ राहण्याची चाल
जर कोणीही बहुमताचा आकडा गाठू शकले नाही, तर फोडाफोडीचे राजकारण किंवा गुप्त मतदानाचा फायदा ठाकरे गटाला मिळू शकतो.
हेही वाचा : Sanjay raut pc संजय राऊतांचे 6 मोठे वक्तव्य! महापौर कुणाचा होणार? ठाकरे धक्का देणार का? थेट सांगितलं












Click it and Unblock the Notifications