Sanjay raut pc संजय राऊतांचे 6 मोठे वक्तव्य! महापौर कुणाचा होणार? ठाकरे धक्का देणार का? थेट सांगितलं
Sanjay raut pc bmc mayor election bjp shinde sena tussle 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून राजकीय रणकंदन पेटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मुंबईत पहिल्यांदा भाजपचा महापौर होईल," असे विधान केल्यानंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आज जोरदार प्रहार केला. "भाजपचा महापौर होणे म्हणजे १०६ हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेल्या मोरारजी देसाईंच्या काळाची पुनरावृत्ती असेल," अशा जहाल शब्दांत राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील १० मोठे धक्के
१. PM मोदींच्या विधानावर टीका : नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बसून कोणाला महापौर करायचे हे ठरवले आहे, पण मुंबईत फक्त भाजप नाही तर गौतम अदानी सुद्धा महापौर कोण होणार हे ठरवणार आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. मोदींना मुंबईच्या राजकीय इतिहासाचे भान नाही, असेही ते म्हणाले.
२. 'शिंदे गट' भाजपचे नगरसेवक फोडतोय : राऊत यांनी गौप्यस्फोट केला की, कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदे गट चक्क भाजपचेच नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे. शिंदे हे भाजपचे 'लोहपुरुष' असून त्यांनी शिवसेना फोडली म्हणून अमित शहा त्यांना खांद्यावर घेऊन फिरत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
३. "आमचे नगरसेवक घरी, तुमचे डांबले का?": उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याचे वृत्त राऊत यांनी फेटाळून लावले. "आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक हॉटेल्समध्ये का डांबून ठेवावे लागले? तुम्हाला भीती कुणाची आहे?" असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
४. उद्धव ठाकरेंचा पक्ष तटस्थ राहणार की नाही? महापौर निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणार का? यावर राऊत म्हणाले की, "आम्ही अजून काही ठरवलेले नाही, आम्ही फक्त मजा बघतोय. वेळ आल्यावर आमचे पत्ते खोलू. पण भाजपचा महापौर होऊ नये म्हणून त्यांचाच सहकारी पक्ष (शिंदे गट) सध्या पाण्यात देव घालून बसला आहे."
५. मुंबई आणि शिवसेनेचे नाते: मुंबईवर गेली २५ वर्षे बाळासाहेब ठाकरेंचे आणि शिवसेनेचे राज्य आहे. भाजप संघर्ष काळात कुठेच नव्हता. भाजपचा महापौर बसवणे वाटते तितके सोपे नाही, कारण मुंबईकरांनी दिलेले आकडे भाजपचा विजय निश्चित करणारे नाहीत.
६. नारायण राणे यांना प्रत्युत्तर: नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, "राणे साहेब, तुम्ही तुमचं बघा. १०-२० जागा जास्त जिंकल्या म्हणजे तुम्ही मोठे होत नाही. तुमची संख्या आम्हाला माहित आहे."
मुंबई महापालिकेत नवा 'ट्विस्ट'
संजय राऊत यांच्या विधानामुळे आता पेच निर्माण झाला आहे. जर ठाकरे गट तटस्थ राहिला, तर भाजपचा मार्ग मोकळा होईल की शिंदे गट शेवटच्या क्षणी 'खेळ' करेल? "आता खरा फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार, आम्ही आणि काँग्रेस मात्र अभेद्य आहोत," असे राऊत यांनी स्पष्ट केल्याने सस्पेन्स आणखी वाढला आहे.












Click it and Unblock the Notifications