Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईकरांनो लक्ष द्या! आज सेंट्रल आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक; वेळापत्रकातील 'हे' बदल जाणून घ्या

Mumbai local mega block sunday 22 february 2026 : रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई लोकलच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. रेल्वेच्या देखभालीसाठी आणि तांत्रिक कामांसाठी मध्य (Central) आणि हार्बर (Harbour) रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेवर (Western Railway) दिवसा कोणताही ब्लॉक नसेल, मात्र रात्रीच्या वेळी तांत्रिक कामे केली जाणार आहेत.

Mumbai local mega block sunday 22 february 2026

मध्य रेल्वे (सेंट्रल लाईन)

  • कुठे: माटुंगा ते मुलुंड दरम्यान (अप आणि डाऊन जलद मार्ग).
  • वेळ: सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत.
  • परिणाम: सीएसएमटीहून (CSMT) सुटणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या सर्व फास्ट लोकल माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील, त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

या' स्थानकांवर लोकल थांबणार नाही!

जर तुम्ही आज, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकलने प्रवासाचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

हार्बर लाईन: कोठे आणि कधी असेल ब्लॉक?

  • हार्बर रेल्वे मार्गावर CSMT ते चुनाभट्टी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक प्रभावित होईल:
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या: सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३७ पर्यंत सुटणाऱ्या अप सेवा चुनाभट्टी ते CSMT दरम्यान अप फास्ट लाईनवरून चालवल्या जातील.

CSMT येथून पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या गाड्या

सकाळी १०:४८ ते दुपारी ३:४९ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन सेवा CSMT ते चुनाभट्टी दरम्यान डाऊन फास्ट लाईनवरून चालवल्या जातील.

महत्त्वाची सूचना: या बदलामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील गाड्या रे रोड, डॉकयार्ड रोड आणि मस्जिद बंदर या स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी नियोजन करावे.

पश्चिम रेल्वे (Western Railway): दिवसा ब्लॉक नाही!

  • पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिवसा कोणताही मेगा ब्लॉक नसेल. मात्र, रात्रीच्या वेळी देखभालीचे काम केले जाईल.
  • नाईट ब्लॉक: २२ आणि २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२:०० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत मरीन लाईन्स आणि माहिम जंक्शन दरम्यान अप फास्ट लाईनवर नाईट ब्लॉक असेल. पटर्या, ओव्हरहेड उपकरणे आणि सिग्नल प्रणालीच्या देखभालीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सल्ला दिला आहे की, घराबाहेर पडण्यापूर्वी अद्ययावत वेळपत्रक तपासावे आणि त्यानुसारच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

आणखी एक आनंदाची बातमी: Ro-Ro Ferry सेवा सुरू!

रेल्वे ब्लॉकच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय समोर आला आहे. मुंबई ते कोकण हा प्रवास आता जलमार्गाने केवळ ५ तासांत पूर्ण होणार आहे. रो-रो फेरी सेवा सुरू होत असून यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+