अबब..! मुंबईतील रिअल इस्टेटला लागली आग; बोरिवलीतील 5 BHKची किंमत वाचून धक्का बसेल!
borivali flat Prize Post viral : भारतातील विविध मेट्रो सिटीमधील जागांच्या किमती आता गगनाला भिडलेल्या आहेत. मुख्य शहरांमधील प्लॅटच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत. याचीच प्रचिती मुंबई बोरिवलीतील एका व्यक्तीने केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून आली. बोरिवलीमध्ये 5 BHK प्लॅटची किंमत एवढी मोठी सांगितली गेली की सर्वसामान्यांना तर धक्काच बसल्याशिवाय राहणार नाही.
विविध शहरांमधील प्लॅटच्या किमतीविषयी आता लोक उघडपणे बोलू लागले आहेत. काही लोक सोशल मीडियावर त्यासंदर्भात लिहून खंत देखील व्यक्त करू लागले आहेत. बोरिवलीमधील एका भागातील प्लॅटच्या किमतीविषयी एका एक्स वापरकर्त्याने केलेल्या पोस्टमुळे मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधील किमती किती झाल्यात, याचा अंदाज लागेल. तर मुंबईचे रिअल इस्टेटला कशी आग लागलेली आहे. याचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही.

कोणी केली पोस्ट, काय म्हटलंय त्यामध्ये?
मेहुल आर. ठक्कर (@MehulThakkar_) या नावाच्या एक्स वापरकर्त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे - बोरिवलीतील 5 बीएचके फ्लॅट 8 कोटींपेक्षा जास्त किमतीत विकले जात आहेत, मला विश्वास बसत नाहीये... 20 वर्षांपूर्वी माझ्या बालपणी येथे 2 बीएचके फक्त 15-20 लाखांना मिळत होते आणि 5 बीएचकेचा पत्ताच नव्हता. ही पोस्ट लिहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. लोक देखील यावर जोरदार कमेंट करू लागले आहेत.
Borivali sells 5 BHK apartments for ₹8 crore++ can't believe.. 20+ years ago, during my childhood: 2 BHK was available for ₹15-20 lakh in Borivali and 5 BHK didn't exist certainly 🥲#RealEstate #Mumbai #Borivali pic.twitter.com/VHTbq7Qgc2
— Mehul R. Thakkar (@MehulThakkar_) June 29, 2025
शेकडो वापरकर्त्यांनी यावर आता प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे - भाऊ, दुबईत 8 कोटींमध्ये घर खरेदी करा! दुसऱ्याने म्हटले - जर माझ्याकडे 8 कोटी असतील तर मी गावात जाऊन राजासारखे जगेन. त्याचप्रमाणे दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले - मला वाटले नव्हते की बोरिवलीची किंमत इतकी असेल. त्याच वेळी, एकाने टिप्पणी दिली - 2022 नंतर सर्व काही बदलले.
मुंबईत घर खरेदी करणे आता स्वप्नच राहणार?
आता मुंबईसारख्या शहरात घर खरेदी करणे स्वप्नासारखे झाले आहे, लोक दुबई आणि इतर देशांकडे पाहू लागले आहेत, जिथे पैशांसोबतच जीवनशैली आणि कर लाभ देखील उपलब्ध आहेत. विशेषतः मिलेनियल्स आणि GenZ अशा पर्यायांचा गांभीर्याने विचार करत आहेत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी म्हणेल - मला मुंबईत घर खरेदी करायचे आहे. मग विचारा - दुबईमध्ये इतक्या किमतीत का नाही?












Click it and Unblock the Notifications